For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका- इराण तणावाने शेअर बाजार घसरणीत

06:47 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका  इराण तणावाने शेअर बाजार घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 372 अंकांनी घसरला,  ऑटो निर्देशांक 2 टक्के नुकसानीत, आयटी आणि मीडिया निर्देशांक घसरले

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 372 अंकांनी तर निफ्टी 109 अंकांनी घसरला होता. फार्मा निर्देशांक सर्वाधिक तेजीत राहिला तर ऑटो निर्देशांक सर्वाधिक घसरणीत राहिला होता.  सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 372 अंकांनी कमकुवत होत 76728 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 109 अंकांनी घसरुन 23946 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 449 अंकांनी घसरत 57727 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांकदेखील 292 अंकांच्या घसरणीसोबत 27038 च्या स्तरावर बंद होताना दिसला.

Advertisement

सकाळी निफ्टी आणि सेन्सेक्सची काहीशा घसरणीसोबत सुरुवात झाली होती. निफ्टीने एका वेळी 24120 अंकांपर्यंत मजल मारली होती. सरतेशेवटी बाजारामध्ये गुंतवणुकदारांनी नफा वसुलीवर भर दिला. विविध निर्देशांकाचा विचार करता ऑटो, कमोडिटीज, आयटी, फायनान्सीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, ऑईल अँड गॅस व रियल्टी यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. एफएमसीजी 291 अंकांनी घसरणीसोबत 49127 अंकांवर बंद झाला. तेजीमध्ये पाहता सीपीएसई, एनर्जी, मेटल आणि फार्मा यांचा समावेश होता. फार्मा निर्देशांक 258 अंकांची तेजी दाखवत 25227 च्या स्तरावर बंद झाला.

हे समभाग वधारले

सोमवारच्या सत्रामध्ये मॅक्स हेल्थकेअर, कोल इंडिया, डॉ. रे•gाrज लॅब्ज, सिप्ला, ट्रेंट, एनटीपीसी, हिंडाल्को, टाटा स्टील, आयटीसी, विप्रो, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, बीईएल, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंटस्, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, सनफार्मा यांचे समभाग तेजीमध्ये पहायला मिळाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, भारती एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन टूब्रो, आयशर मोटर, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, एचपीसीएल, पर्सिस्टंट सिस्टीम, अॅस्ट्रल, सुप्रीम इंडस्ट्रीज, पीआय इंडस्ट्रीज यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

Advertisement
Tags :

.