For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयटी कंपन्यांमुळे शेअरबाजारात घसरण

06:52 AM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयटी कंपन्यांमुळे शेअरबाजारात घसरण
Advertisement

सेन्सेक्स 466 अंकांनी नुकसानीत : व्हिसा शुल्काचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसा नियमात बदल केल्याचा परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारात नकारात्मक दिसून आला. सेन्सेक्स 446 अंकांनी घसरत बंद झाला तर आयटी निर्देशांक सर्वाधिक 3 टक्के इतका घसरणीत होता.

Advertisement

अमेरिकेने व्हिसा शुल्कात प्रचंड वाढ केल्याचा नकारात्मक परिणाम आयटी कंपन्यांच्या समभागांवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 466 अंकांनी घसरुन 82159 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 124 अंकांच्या घसरणीसोबत 25202 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 174 अंकांनी घसरुन 55284 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीत होते.

निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता आयटी निर्देशांक सर्वाधिक  3 टक्के म्हणजेच 1078 अंकांनी कोसळत 35500 अंकांवर बंद झाला होता. विप्रोचा समभाग 2.11 टक्के, इन्फोसिसचा 2.55 टक्के आणि टीसीएसचा समभाग 2.96 टक्के इतका घसरणीत राहिला होता. यासोबत कोफोर्ज, पर्सिस्टंट सिस्टम्स यांचेही समभाग घसरणीत होते. अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस 3.98 टक्के, अदानी ग्रीन 11 टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्स 6.87 टक्के आणि अदानी पॉवरचा समभाग 20 टक्के वाढलेला दिसून आला. सेन्सेक्समध्ये पाहता टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.

निर्देशांकाच्या कामगिरीकडे पाहिल्यास बँक, एफएमसीजी, ऑटो सलग दुसऱ्या सत्रात घसरणीत दिसून आले. धातू निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात नुकसानीत राहिला. तसेच फायनॅन्शीयल, रिअल्टी, ऑइल अँड गॅस, फार्मा यांचे निर्देशांक घसरणीत राहिले. निफ्टी एनर्जी निर्देशांक चांगल्या तेजीसह बंद झाला. अदानी समूहामुळे हा निर्देशांक चमकला होता. तसेच कमोडिटीज, सीपीएसई यांचे निर्देशांकही वधारले होते.

जागतिक बाजारात पाहता आशियाई बाजारात तेजी होती. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात टेलिफोनवरुन बातचीत झाली असून तिचा सकारात्मक परिणाम आशियाई बाजारांवर दिसला. येणाऱ्या आर्थिक सहयोग शिखर परिषदेत ट्रम्प जिनपिंग यांच्याशी बोलणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. जपानचा निक्केई 1.4 टक्क वाढत व्यवहार करत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.9 टक्के वाढत व्यवहार करत होता. फेडरलच्या व्याजकपातीमुळे शुक्रवारी वॉल स्ट्रीटवरील शेअर बाजार तेजीसोबत बंद झाला होता. एस अँड पी 500 व नॅसडॅक अनुक्रमे 0.49 टक्के, 0.72 टक्के वाढत बंद झाले होते.

Advertisement
Tags :

.