For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण -अमेरिका तणावाणे शेअरबाजारात घसरण

06:31 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण  अमेरिका तणावाणे शेअरबाजारात घसरण
Advertisement

सेन्सेक्स 561 अंकांनी नुकसानीत, रुपया वधारला, ब्रेंट व्रुड 2 टक्के महागले

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

इराण अमेरिका यांच्या तणावाने भारतीय शेअर बाजारात मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 561 अंकांनी तर निफ्टी 157 अंकांनी घसरणीत होता. आयटी निर्देशांक घसरत बंद झाला.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 561 अंकांनी घसरुन 77054 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 158 अंकांनी घसरुन 24052 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 669 अंकांनी कमकुवत होत 57462 अंकांवर राहिला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 घसरणीत होते. निफ्टीतील 50 पैकी 34 समभाग हे घसरणीसह बंद झाले होते. बँकांच्या निर्देशांकात 14 पैकी 13 बँकांचे समभाग दबावात होते. ब्रेंट व्रुड तेलाचे दर 84 डॉलर प्रति बॅरलवर वाढले होते. तर रुपया डॉलरच्या तुलनेत 58 पैसे कमकुवत झाला होता. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती तसेच रुपया कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली व याने बाजारात दबाव तयार झाला.

बाजारात पाहता निफ्टीत एचसीएल टेक, श्रीराम फायनान्स व एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स हे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकाची कामगिरीही दबावात होती. मिडकॅप निर्देशांक 0.44 टक्के आणि स्मॉलकॅप 1.01 टक्का इतके घसरत बंद झाले.

ऑटो, पीएसयू बँक व रियल्टी समभाग सर्वाधिक विक्रीत राहिले होते. फार्मा क्षेत्राचा निर्देशांक मजबूत होत बंद झाला. मेटल समभागही चांगले तेजीत होते. आयटी, तेल व गॅस निर्देशांक घसरला होता. रुपया याचदरम्यान 96 च्या वर पोहचला होता. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने चिंता अधिक वाढली होती. अमोरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 0.55 टक्के घसरत 96.20 स्तरावर होता. परिणामी गुंतवणूकदारांनी सावध राहणेच अधिक पसंत केले होते. मंगळवारी एसबीआय फंडस् मॅनेजमेंट व अल्पाइन टेक्सवर्ल्ड यांचे आयपीओ खुले झाले आहेत. एसबीआय आयपीओतून 9813 कोटी तर अल्पाइन आयपीओतून 126.25 कोटी रुपये रक्कम उभारणार आहे.

 आशियाई बाजारात तेजी

दुसरीकडे आशियाई बाजारात मात्र तेजी होती. दक्षिण कोरीयाचा कोस्पी 50 अंक अर्थात 0.73 टक्के वाढत 6875 वर कार्यरत होता. जपानचा निक्केई 501 अंक अर्थात 0.74 टक्के वाढत 67744 वर तर हाँगकाँगचा हँगसेंग 127 अंक अर्थात 0.52 टक्के वाढत 24341 अंकांवर कार्यरत होता.

Advertisement
Tags :

.