शुक्रवारी शेअरबाजाराची घसरणीसह आठवड्याची सांगता
सेन्सेक्स 120 अंकांनी तर निफ्टी 79अंकांनी घसरणीत, कच्चे तेल भडकले
वृत्तसंस्था, मुंबई
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात पुन्हा दबाव दिसून आला. शुक्रवारी विक्रीवर भर दिलेला दिसून आला. दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले.
बाजारात अस्थिरता मात्र कायम राहिली होती. ब्रेंट व्रुड तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढता जागतिक तणाव याने सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यावर भारतीय निर्देशांकांनी त्यांच्या नीचांकी पातळीवरून रिकव्हरी केली. सेन्सेक्स नीचांकी पातळीवरून जवळपास 600 अंकांनी वधारत सावरताना दिसला. शुक्रवारी सरतेशेवटी सेन्सेक्स 120 अंकांनी घसरून 74,781.76 वर बंद झाला. निफ्टी 79 अंकांनी घसरून 23,398.10 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारांकडून मिळणारे कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ही या घसरणीची मुख्य कारणे असल्याचे मानले जात आहे. भारतीय रुपया देखील अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 95.52 पर्यंत कमकुवत झाला. याचा शेअर बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 107 डॉलरच्या पुढे गेल्या.
हे समभाग तेजीत
शुक्रवारी अखेरच्या दिवशीही बाजारात घसरणीचा कल दिसून आला होता. समभागांचा विचार करता बरेचसे समभाग हे नुकसानीसह बंद झाले. निफ्टीत एचडीएफसी बँक, डॉ. रे•िज लॅब्ज, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाइफ, विप्रो, कोटक बँक, इंडिगो, इटर्नल, आयटीसी, टाटा मोटर्स पीव्ही, अट्राटेक सिमेंट, इन्फोसिस व अॅक्सिस बँक यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात यस बँक, इंडस टॉवर्स, वन 97, बीएसई लिमिटेड, आयडीबीआय बँक व एलआयसी एच. फायनान्स या समभागांनीही तेजी राखली होती.
हे समभाग घसरणीत
घसरणीत पाहता आयटी कंपनी टीसीएस, एचसीएल टेक, ट्रेंट, बीईएल, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फिनसर्व्ह, ग्रासिम, टाटा स्टील, टाटा कंझ्युमर, टायटन, अदानी एंटरप्रायझेस, एचयुएल, सनफार्मा, रिलायन्स, कोल इंडिया, एसबीआय, मारुती सुझुकी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को यांचे समभाग होते.
विविध क्षेत्रांची कामगिरी
फायनॅन्शीयल्स व आयटी हे दोन क्षेत्रांचे समभाग अल्पशी तेजीची कामगिरी करत बंद झाले होते. याशिवाय ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक मात्र घसरणीत होते. मेटल निर्देशांक सर्वाधिक 305 अंकांनी घसरत 12999 अंकांवर बंद झाला. एनर्जी निर्देशांक 288 अंकांनी घसरुन 37935 अंकांवर बंद झाला.