कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शुक्रवारी शेअरबाजारात अल्पशी घसरण

06:31 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 13 अंकांनी घसरणीत, रियल्टी समभाग नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजार हलक्या घसरणीसोबत बंद झाला. आयटी, रियल्टी समभागांमध्ये दबाव दिसून आला. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 13 अंकांनी घसरून 85706 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 12 अंकांनी घसरत 26202 अंकांवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रामध्ये ऑईल आणि गॅस, रियल्टी, प्रायव्हेट बँक आणि आयटी निर्देशांकांची कामगिरी नकारात्मक राहिली. दुसरीकडे धातू, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक मात्र तेजी दाखवत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांक 15 अंकांनी वाढत 59752 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. 27 नोव्हेंबरला 14 महिन्यानंतर शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांकी स्तर प्राप्त केला होता. निफ्टीने व्यवहारादरम्यान 26310 तर सेन्सेक्सने 86055 चा सर्वोच्च स्तर गाठला होता. यापूर्वी सेन्सेक्सने 27 सप्टेंबर 2024 रोजी 85978 चा स्तर तर निफ्टीने 26277 चा सर्वोच्च स्तर गाठला होता. 27 नोव्हेंबरला विदेशी गुंतवणूकदारांनी 1255 कोटींचे समभाग विक्री केले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 3940 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

हे समभाग तेजीत

समभागांची कामगिरी पाहता महिंद्रा आणि महिंद्रा, एचयुएल, अदानी एन्टरप्रायझेस, आयशर मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा, हिंडाल्को, मॅक्स हेल्थकेअर, टीसीएस, सिप्ला, डॉ. रे•ाrज लॅब्ज, रिलायन्स, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, सनफार्मा यांचे समभाग तेजी समवेत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे मारुती सुझुकी, ग्रासीम, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, लार्सन टुब्रो, ट्रेंट, इन्फोसीस, भारती एअरटेल, इटर्नल, टाटा मोटर्स पी. व्ही. यांचे समभाग घसरणीत होते.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article