For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुधवारच्या सत्रातही शेअरबाजारात घसरण

06:02 AM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुधवारच्या सत्रातही शेअरबाजारात घसरण
Advertisement

सेन्सेक्स 141 अंकांनी घसरणीत, फायनॅन्शीयल, प्रायव्हेट बँकांचे समभाग कमकुवत

Advertisement

बुधवारी भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण अनुभवायला मिळाली आहे. सेन्सेक्स दिवसअखेर 141 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला. आयटी, बँकांचा निर्देशांकही कमकुवत होता.

त. भा. मुंबई

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 141 अंकांनी घसरुन 75867 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 6 अंकांनी घसरत 23907 च्या स्तरावर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांक 239 अंकांनी कमकुवत होत 54853 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांकही दबावासह 71 अंकांनी घसरत 28906 अंकांवर बंद झाला.

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास चार निर्देशांक हे दबावात बंद झाले तर उर्वरीत वधारत बंद झाले. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, मेटल, फार्मा व रियल्टी या क्षेत्राच्या निर्देशांकांनी चमकदार कामगिरी केली. यात एनर्जी निर्देशांक सर्वाधिक 721 अंकांनी चढत 41535 च्या स्तरावर बंद होताना दिसला. यानंतर ऑटो निर्देशांक 383 अंकांनी वाढत 26864 अंकांवर बंद झाला.

हे समभाग चमकले

बुधवारी शेअरबाजारात पाहता हिंडाल्को, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड कॉर्प, इटर्नल, एनटीपीसी, बजाज ऑटो यांचे समभाग सर्वाधिक वाढत बंद झाले. इंडिगो, टाटा कंझ्युमर्स, टायटन, जियो फायनॅन्शीयल्स, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, ग्रासिम, अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, टीसीएस, एचसीएल टेक, कोटक बँक, मारुती सुझुकी, लार्सन टुब्रो, ट्रेंट, एशियन पेंटस्, महिंद्रा आणि महिंद्रा, कोल इंडिया, टाटा स्टील, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल यांचे समभागही मजबूतीसह बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे काही समभागांची कामगिरी मात्र खराब दिसून आली. ओनजीसी, आयटीसी, एचडीएफसी बँक, विप्रो, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ यांचे समभाग सर्वाधिक घसरलेले होते. यासोबत नेस्ले, एचयुएल, रिलायन्स, डॉ. रे•िज लॅब्ज, इन्फोसिस, बीईएल, भारत डायनॅमिक्स, बीएसई लिमिटेड, आरव्हीएनएल, कोफोर्ज, पतंजली फुडस् यांचेही समभाग नुकसानीसह बंद होताना दिसले. जागतिक बाजारात पाहता दक्षिण कोरीयाचा कोस्पी 2.25 टक्के इतका तेजीसह कार्यरत होता. तर जपानचा निक्केई निर्देशांक 0.01 टक्के तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1.06 टक्के इतका घसरणीत होता.

Advertisement
Tags :

.