For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग चौथ्या सत्रात शेअरबाजार घसरणीत

06:42 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सलग चौथ्या सत्रात शेअरबाजार  घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 508 अंकांनी घसरला, एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक घसरणीत, ऑटो समभागही कमकुवत

Advertisement

 वृत्तसंस्था, मुंबई

सलग चौथ्या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजार कमकुवत होत बंद झालेला पहायला मिळाला. सोमवारी सेन्सेक्स 508 अंकांनी घसरणीत राहिला होता. एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक अडीच टक्के इतका नुकसानीसह बंद झाला होता. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 508 अंकांनी घसरुन 74267 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 165 अंकांनी कमकुवत होत 23382 अंकांवर बंद झाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता अडीच टक्के इतका एफएमसीजी निर्देशांक घसरणीत राहिला होता. रियल्टी व डिफेंन्स यांचे निर्देशांकही दीड टक्के घसरलेले होते. मिडकॅप निर्देशांक देखील दीड टक्के घसरण नोंदवत बंद झाला.

Advertisement

विविध समभागांची कामगिरी

विविध समभागांच्या कामगिरीकडे पाहता टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोल इंडिया, टीसीएस, जे.एस.डब्ल्यू स्टील, हिंडाल्को, टाटा स्टील, इंडिगो, विप्रो, एचसीएल टेक यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता रिलायन्स, सनफार्मा, सिप्ला, इटर्नल, लार्सन टूब्रो, भारती एअरटेल, एसबीआय लाईफ, बीईएल, आयशर मोटर्स, एसबीआय, नेस्ले, एनटीपीसी, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, कोटक महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स पीव्ही, श्रीराम फायनान्स, पॉवरग्रीड कॉर्प, ट्रेंट, टायटन व हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्ंाs समभाग घसरणीसोबत बंद झाले.

क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता आयटी निर्देशांक सर्वाधिक तेजी अनुभवत बंद झाला. निफ्टी मेटल निर्देशांकदेखील अल्पशा तेजीसमवेत बंद झाला होता. एफएमसीजी निर्देशांक 1135 अंकांनी नुकसानीसोबत 48247 अंकांवर बंद झाला. या पाठोपाठ एनर्जी निर्देशांक 624 अंकांनी घसरत 40253 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक 774 अंकांच्या वाढीसोबत 29854 च्या स्तरावर बंद झाला. जागतिक बाजारामध्ये पाहता दक्षिण कोरियाचा कोस्पी 3.68 टक्के वाढलेला होता. जपानचा निक्केई 0.91 टक्के तेजी दाखवत व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंगसुद्धा 0.86 टक्के तेजी दाखवत बंद झाला.

Advertisement
Tags :

.