For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेल कंपन्यांच्या दबावात शेअरबाजारात घसरण

06:58 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेल कंपन्यांच्या दबावात शेअरबाजारात घसरण
Advertisement

सेन्सेक्स 376अंकांनी घसरणीत : रिलायन्स समभाग घसरला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय शेअरबाजारात दुसऱ्या दिवशीही मंगळवारी दबाव पाहायला मिळाला. सेन्सेक्स 376 अंकांनी तर निफ्टी 71 अंकांच्या घसरणीसोबत बंद होताना दिसला आहे. आयटी, फार्मा समभागांची कामगिरी दमदार दिसली पण दिग्गज रिलायन्स व एचडीएफसी बँक यांच्या कमकुवत कामगिरीने बाजार खाली घसरला.

Advertisement

सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांनी घसरत 85063 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 71 अंकांनी घसरत 26178 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 15 समभाग हे तेजीसोबत तर 15 समभाग नुकसानीसोबत बंद झाले होते.

समभागांची कामगिरी

शेअरबाजारात मंगळवारी माहोल घसरणीचाच दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रिज, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स पीव्ही, अदानी पोर्टस्, ट्रेंट, इंटरग्लोब एव्हिएशन, कमिन्स, एसजेव्हीएन, सेल, डिक्सन टेक्नॉलॉजी, फेडरल बँक, कोल इंडिया, बीईएल, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो यांचे समभाग घसरणीत राहिले होते. तर दुसरीकडे तेजीत पाहता अपोलो हॉस्पिटल,  एचडीएफसी लाइफ, टाटा कंझ्युमर, सनफार्मा, बजाज ऑटो, एसबीआय कार्ड, लुपिन, अपोलो टायर्स, पेट्रोनेट एलएनजी, मॅनकाइंड, ओएनजीसी, विप्रो, आयशर मोटर्स, डॉ. रे•िज लॅब्ज, इन्फोसिस, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थकेअर, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, टायटन, मारुती सुझुकी, हिंडाल्को, एसबीआय यांचे समभाग चांगली कामगिरी करत होते.

क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी पाहिल्यास फार्मा, आयटी, ऑटो, मेटल, एफएमसीजी, फायनॅन्शीयल्स यांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले तर दुसरीकडे कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, ऑईल अँड गॅस व रिअॅल्टी यांचे निर्देशांक मात्र दबावात बंद झाले होते. मिडकॅप व स्मॉलकॅपमधील समभागांची विक्री मंगळवारी झालेली दिसून आली.

Advertisement
Tags :

.