सलग तिसऱ्या सत्रात शेअरबाजारात घसरण कायम
2.74 लाख कोटींचे गुंतवणूकदारांचे नुकसान, 373 अंकांनी सेन्सेक्स घसरणीत, कच्चे तेल पुन्हा भडकले
त. भा. वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा बुधवारी हल्ले झाल्याने कच्चे तेल मोठया प्रमाणात वाढले. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सेन्सेक्स 373 अंकांनी तर निफ्टी 141 अंकांनी घसरणीसह बंद झाला. ऑटो व आयटी निर्देशांकांनी बाजारावर दबाव निर्माण केला होता. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजारात दबावाचे वातावरण होते. अमेरिका व इराण यांनी परस्पर हल्ले करण्यास सुरुवात केल्याने कच्चे म्हणजे ब्रेंट व्रुडचे दर 96 डॉलर प्रति बॅरलवर भडकल्याने गुंतवणूकदार सावध झाले.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 373 अंकांनी घसरत 76570 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 141 अंकांनी घसरत 23914 अंकांवर बंद होताना दिसला. सेन्सेक्समध्ये पाहता 30 पैकी 20 समभाग नुकसानीसोबत बंद झाले तर निफ्टीत 50 समभागांपैकी 36 समभाग दबावासह बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांकात पाहता 14 पैकी 7 बँका तोट्यासह बंद झाल्या.
निफ्टी मिडकॅप-100 0.53 टक्केच्या घसरणीत तर निफ्टी स्मॉलकॅप-100 देखील 0.37 टक्केच्या घसरणीसह बंद झाला. आयटी क्षेत्राने बाजारावर इतका दबाव निर्माण केला की त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. हा निर्देशांक सरतेशेवटी 393 अंकांनी घसरुन 31102 अंकांवर बंद झाला. निफ्टी ऑटो दीड टक्क्यांहून अधिक कमजोर होत बंद झाला. विक्रीच्या दबावामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरले होते. हेच भांडवल मूल्य 1 सप्टेंबर 2026 रोजी बीएसईवर 4,89,41,989.64 कोटी रुपये होते. 2 सप्टेंबर 2026 रोजी ते 4,86,65,456.58 कोटींवर आले. हे पाहता बुधवारी गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,76,533.06 कोटींची घट झाली आहे.
समभागांची कामगिरी
निफ्टीमध्ये पाहता कोल इंडिया, अदानी पोर्टस, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स पीव्ही व पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत होते.

- अदानी पोर्ट 1672
- बजाज फिनसर्व्ह 1990
- पॉवरग्रिड कॉर्प 267
- एनटीपीसी 330
- टायटन 5070
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1313
- ट्रेन्ट 2862
- बजाज फायनान्स 1057
- सनफार्मा 1933
- आयटीसी 266
- टाटा पॉवर 363
- कोल इंडिया 418
- वरुण बेव्हरेज 414
- फेडरल बँक 353
- बीपीसीएल 318
- जिओ फायनान्स 237
- श्री सिमेंट 23589
- कोलगेट 1857

- एशियन पेन्ट्स 2526
- महिंद्रा-महिंद्रा 3191
- एचडीएफसी बँक 700
- एचसीएल टेक 1330
- भारत इले. 405
- इन्फोसिस 1139
- स्टेट बँक 1020
- इंटरग्लोब एव्ही. 5005
- हिंदुस्थान युनि. 1976
- टीसीएस 2345
- टेक महिंद्रा 1622
- आयसीआयसीआय 1428
- मारुती सुझुकी 12842
- भारती एअरटेल 1860
- अॅक्सिस बँक 1255
- इटर्नल 326
- टाटा स्टील 183
- अल्ट्राटेक सिमेंट 11380
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3989
- कोटक महिंद्रा 424
- हिरोमोटो 5309
- आयशर मोटर्स 7700
- विप्रो 177
- मॅक्स हेल्थकेअर 994
- एसबीआय लाईफ 1726