सलग दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात घसरण सुरुच
सेन्सेक्स 388 अंकांनी घसरणीत, बँकांचे समभाग दबावात, फार्मा निर्देशांक चमकला
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 388 अंकांनी घसरत 78154 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 112 अंकांनी घसरत 24471 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांक 240 अंकांनी कमकुवत होत 57446 अंकांवर बंद झाला होता.
हे समभाग वधारले
भारतीय शेअरबाजारात निफ्टीची मंगळवारी एक्सपायरी होती. यादरम्यान बाजारात डॉ. रे•िज लॅब्ज, टीसीएस, इटर्नल, इन्फोसिस, एचसीएल टेक, टायटन, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, बीईएल, टाटा मोटर्स पीव्ही, टेक महिंद्रा हे निफ्टीतील समभाग तेजीत होते. मिडकॅप निर्देशांकात पाहता एमआरपीएल, पीबी फिनटेक, ऑईल इंडिया, पुनावाला फिन., काँकोर व बँक ऑफ इंडिया यांचे समभागही मजबूत होत बंद झाले होते.
हे समभाग घसरले
दुसरीकडे घसरणीत असणाऱ्या समभागांची संख्या मंगळवारी मोठी होती. एसबीआय, कोटक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, ओएनजीसी, रिलायन्स, सिप्ला, हिंडाल्को, जियो फायनान्स, विप्रो, पॉवरग्रिड कॉर्प, इंडिगो, आयटीसी, एचयुएल, लार्सन टुब्रो, महिंद्रा आणि महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, मॅक्स हेल्थकेअर, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, भारती एअरटेल, एसबीआय लाइफ, श्रीराम फायनान्स, एशियन पेंटस्, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात पाहता एबी फॅशन अँड रिटेल, गोदरेज प्रॉपर्टीज, महिंद्रा आणि महिंद्रा फायनॅन्शीयल, सुंदरम फायनान्स व एमआरएफ यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.
क्षेत्रांमध्ये आयटी, फार्माची चमक
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी मंगळवारी यथातथाच राहिली होती. यात आयटी, ऑईल व गॅस तसेच फार्मा या क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. फार्मा निर्देशांक सर्वाधिक 270 अंकांनी वाढत 26750 अंकांवर बंद झाला. इतर निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरणीत होता तो एफएमसीजी निर्देशांक. हा निर्देशांक 575 अंकांनी घसरत 48787 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, मेटल व रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीत होते.