For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-इराण तणावाने शेअरबाजार कोसळला

06:58 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका इराण तणावाने शेअरबाजार कोसळला
Advertisement

सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरणीत, 10 लाख कोटी बुडाले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

इराणवर अमेरिका व इस्त्रायल यांनी संयुक्तपणे जोरदार हल्ला चढविला असून याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर सोमवारी पहायला मिळाले. सेन्सेक्स हजार अंकांनी तर निफ्टी 300 हून अधिक अंकांनी कोसळलेला दिसला. गुंतवणुकदारांचे एकाच दिवशी 10 लाख कोटी बुडाल्याचे पहायला मिळाले.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1048 अंकांनी कोसळत 80238 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकदेखील 312 अंकांनी घसरत 24865 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 689 अंकांनी घसरत 59839 अंकांवर बंद झाला. निफ्टीमधील 50 पैकी 42 समभाग घसरणीसोबत बंद झाले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग घसरणीत राहिले. मेटल आणि फार्मा यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक दीड टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीत राहिले होते. ऑटो, रियल्टी, एनर्जी निर्देशांक तसेच आयटी, एफएमसीजीदेखील घसरणीसमवेत बंद झाले.

समभागांची कामगिरी पाहता भारत इलेक्ट्रॉनिक, सनफार्मा, डॉ. रे•ाrज लॅब्ज, ओएनजीसी, आयटीसी, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता एलअँडटी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक हे दिग्गज समभाग घसरणीसोबत बंद झाले. यासह एसबीआय लाईफ, भारती एअरटेल, नेस्ले, टीसीएस, विप्रो, एनटीपीसी, इन्फोसिस, महिंद्रा अणि महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड कॉर्प, टेंट, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.

जागतिक बाजारात जपानचा निक्केई निर्देशांक 1.35 टक्के घसरत 58057 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंगदेखील 2.14 टक्के घसरत 26059 अंकांवर बंद झाला.

Advertisement
Tags :

.