For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पशा तेजीसह शेअरबाजार सोमवारी बंद

06:42 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्पशा तेजीसह शेअरबाजार सोमवारी बंद
Advertisement

सेन्सेक्स 26 अंकांनी तेजीत, कच्च्या तेलाच्या किमतीत अमेरिका-इराण तणावामुळे वाढ

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअरबाजारात चढउतार पाहायला मिळाला. सरतेशेवटी हलक्याशा तेजीसमवेत बाजार बंद झाला. अमेरिका व इराण यांच्या संघर्षातील अनिश्चितता संपायला तयार नाही. त्याचे परिणाम बाजारावर दिसले. तर कच्च्या तेलाच्या किमतीत सोमवारी 6 टक्के इतकी वाढ झालेली दिसून आली.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 26 अंक वाढत 78520 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 11 अंकांनी वाढत 24364 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 78,632 अंकांवर तर निफ्टी 24,391 अंकांवर खुला झाला होता. स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकांची कामगिरी निराशादायी राहिली. स्मॉलकॅप-100 0.45 टक्के तर मिडकॅप-100 0.18 टक्के घसरणीसोबत बंद झाले.

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता 5 निर्देशांक कमकुवत होत बंद झाले होते. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, ऑईल व गॅस यांचे निर्देशांक तेजी दाखवत बंद झाले. एफएमसीजी, आयटी, मेटल, फार्मा व रिअल्टी यांचे निर्देशांक मात्र घसरणीसोबत बंद झाले.

हे समभाग वधारले

समभागांची कामगिरी पाहता ट्रेंट 3 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 2.7 टक्के, एसबीआय 2.5 टक्के, एशियन पेंटस् 2.1 टक्के व ग्रासिम 1.4 टक्के वाढत बंद झाले. याखेरीज इटर्नल, इंडिगो, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर्स, नेस्ले, मॅक्स हेल्थकेअर, पॉवरग्रिड कॉर्प, आयशर मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, बजाज ऑटो यांचे समभाग तेजीसह बंद होताना दिसले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे जियो फायनॅन्शीयल्स, हिंडाल्को, टाटा मोटर्स पीव्ही, कोटक महिंद्रा बँक, बीईएल व लार्सन टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते. याशिवाय मारुती सुझुकी, रिलायन्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, आयटीसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, सिप्ला, विप्रो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी यांचेही समभाग नुकसानीसोबत बंद होताना दिसले.

Advertisement
Tags :

.