For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ उताराच्या सत्रात शेअर बाजार अल्पशा तेजीसोबत बंद

06:30 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
चढ उताराच्या सत्रात शेअर बाजार अल्पशा तेजीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 43 तर निफ्टी 13 अंकांनी तेजीत : आयटी समभागांची खरेदी

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

या आठवड्यातला पहिला सोमवारचा दिवस हा बाजारासाठी चढउताराचा दिसून आला. शेवटच्या क्षणी सेन्सेक्स 43 अंक व निफ्टी 13 अंकांनी नाममात्र वाढत बंद होताना दिसला. आयटी आणि फायनॅन्शीयल क्षेत्राच्या निर्देशांकाने तेजी राखत बाजाराला आधार दिला. निफ्टी बँक निर्देशांक अल्पशा घसरणीसह बंद झाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 43 अंकांनी वाढत 78542 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 13 अंकांच्या वाढीसोबत 24583 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 18 समभागांनी तेजी राखली होती. निफ्टी बँक निर्देशांक दिवसअखेर 59 अंकांनी वाढत 57686 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांकात पाहता 14 पैकी 8 बँकांची कामगिरी मजबूत राहिली होती. सोमवारी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकाची कामगिरी मिळतीजुळती राहिली होती.

हे समभाग वधारले

निफ्टीत पाहता टायटनचा समभाग सर्वाधित तेजीत राहिला होता. हा समभाग 3.02 टक्के वाढत बंद झाला. यानंतर टाटा कंझ्युमर 2.44 टक्के, बजाज फायनान्स 2.25 टक्के, श्रीराम फायनान्स 2.05 टक्के व ग्रासिम इंडस्ट्रिजचा समभाग 1.74 टक्के इतका वाढत बंद झाला.

अॅक्सिस बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स पीव्ही, इंडिगो, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो व ट्रेंट यांचेही समभाग तेजीत होते.

हे समभाग घसरले

तर दुसरीकडे घसरणीत मात्र एसबीआयचा समभाग सर्वाधिक घसरणीत राहिला होता. हा समभाग 2.39 टक्के घसरला. यासोबत इटर्नल 1.51 टक्के, आयटीसी 1.21 टक्के, डॉ. रे•िज लॅब्ज 1.13 टक्के व टीसीएसचा समभाग 1.11 टक्के इतका घसरत बंद झाला. यानंतर अपोलो हॉस्पिटल, हिंडाल्को, भारती एअरटेल, कोल इंडिया, जियो फायनान्स, विप्रो, अदानी एंटरप्रायझेस, एचयुएल, मॅक्स हेल्थकेअर, आयशर मोटर्स यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले.

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास कमोडिटीज, आयटी, फायनॅन्शीयल्स, रियल्टी, मेटल यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले. तर दुसरीकडे ऑटो, सीपीएसई, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा व फार्मा यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते.

Advertisement
Tags :

.