कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नफा वसुलीमुळे शेअरबाजार अल्पशा तेजीसह बंद

07:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 130 अंकांनी तेजीत, बँकिंग, आयटी समभाग चमकले

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

आयटी समभाग आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात 700 अंकांच्या तेजीसोबत असणारा शेअरबाजार शेवटच्या सत्रात नाममात्र तेजीसमवेत बंद झाला. दिग्गज समभागांमध्ये नफा वसुलीमुळे शेअरबाजारातली मोठी तेजी कमी झाली.

गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 130 अंकांनी वाढत 84556 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 22 अंकांनी वाढत 25891 अंकांनी बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 70 अंकांनी वाढत 58078 अंकांवर बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. याचदरम्यान सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 734 अंकांच्या तेजीसमवेत 85290 च्या स्तरावर तर निफ्टी निर्देशांक 123 अंकांच्या वाढीसोबत 26014 च्या स्तरावर पोहोचला होता.

इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे आयटी निर्देशांकातील समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. दुसरीकडे बजाज फिनसर्व, मारुती सुझुकी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले. तसेच इंडिगो, आयशर मोटर्स, सनफार्मा यांचे समभागदेखील नुकसानीसोबत बंद झाले. शेअरबाजारात टेक्सटाईल संबंधीत समभागांची खरेदी दिसून आली. यांचे समभाग जवळपास 5 ते 10 टक्के इतके तेजीत दिसून आले. अमेरिकेसोबतच्या व्यापाराबाबत दिलासादायक बातमी अमेरिकेतून आल्याने त्याचा परिणाम टेक्सटाईल कंपन्यांच्या समभागांवर पाहायला मिळाला.

दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज व इटर्नल यांचा समभाग 3 टक्के घसरणीत होता. भारत फोर्ज या समभागात गुरुवारी 4 टक्के तेजी पहायला मिळाली. कंपनीला 2770 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. एचयूएल कंपनीने आपल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून या निकालाचा परिणाम समभागावर फारसा दिसून आला नाही. अल्पशा वाढीसोबत समभाग बंद झाला होता. व्होडाफोन आयडियाचा समभाग 6 टक्के वाढला असून येत्या सोमवारी एजीआर बाकी संबंधित न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. आशियातील बाजारात जपानचा निक्केई, शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हॅगसेंग निर्देशांक घसरणीत होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article