शुक्रवारी शेअर बाजार तेजीसमवेत बंद
सेन्सेक्स 316 अंकांनी वधारला, पीएसयू बँक निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
आशियाई बाजारातील मिळत्याजुळत्या कलासोबत रिलायन्ससारख्या दिग्गज समभागाच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअरबाजार तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 316 अंकांनी वधारत तर निफ्टी 117 अंकांनी वाढत बंद झाला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 316 अंकांनी वाढत 82814 अंकांनी बंद झाला. दुसरीकडे 50 समभागांचा समावेश असणारा निफ्टी निर्देशांक 117 अंकांनी वाढत 25571 वर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक चांगल्या तेजीसह कार्यरत होता. दिवसअखेर हा निर्देशांक 432 अंकांनी वाढत व्यवहार करत होता. पीएसयू बँक आणि धातू संबंधित कंपन्यांचे समभाग मजबूत पहायला मिळाले. याच्यासोबतच लार्सन आणि टूब्रो व रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांच्या समभागांनी मजबुतीसोबत बाजाराला आधार दिला. आयटी समभाग हे शुक्रवारी दबावातच पहायला मिळाले.
हे समभाग तेजीत
शेअरबाजारात हिंडाल्को, एनटीपीसी, लार्सन टूब्रो, एसबीआय लाईफ, कोल इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, टायटन, सिप्ला, सन फार्मा, टाटा मोटर्स पीव्ही, ट्रेंट, टीसीएस, आयटीसी, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग तेजीत होते. मिडकॅपमध्ये पाहता भारत डायनॅमिक, पीबी फिनटेक, ट्यूब इन्व्हेसमेंटस्, अशोक लेलँड, टोरेंट पॉवर, व्होल्टास यांचे समभागही तेजीत होते.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे अदानी पोर्ट, डॉ. रे•ाrज लॅब्ज, एचडीएफसी बँक, टाटा कंझ्युमर्स, भारती एअरटेल, महिंद्रा आणि महिंद्रा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, इटर्नल, विप्रो, एचसीएल टेक, एचडीएफसी लाईफ यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले. मिडकॅपमध्ये पाहता कोफोर्ज, यूपीएल, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि सुजलॉन एनर्जी यांचे समभाग दबावात होते.