For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँकिंग समभागांमुळे शेअरबाजार तेजीसोबत बंद

06:43 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बँकिंग समभागांमुळे शेअरबाजार तेजीसोबत बंद
Advertisement

धातू निर्देशांकाची चमक, सेन्सेक्स 319 अंकांनी तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स 319 अंकांच्या वधारासह बंद झाला होता. बँकिंग व मेटल क्षेत्रातील समभागांच्या दमदार कामगिरीमुळे बाजार तेजीत बंद झाला.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 319 अंकांनी वाढत 81857 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 126 अंकांनी वाढत 25175 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकाने मंगळवारी चमकदार कामगिरी केली. 732 अंकांनी वाढत हा निर्देशांक 59205 अंकांवर बंद झाला. या निर्देशांकात 12 बँकांचे समभाग मजबूत होत बंद झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग तेजीत होते तर निफ्टीत 50 पैकी 32 समभाग तेजी राखत बंद झाले. सुरुवातीच्या सत्रात शेअरबाजारात घसरण होती. पण शेवटच्या 20 मिनीटात बाजारात तेजी आली.

 हे समभाग तेजीत

शेअरबाजारात पहता अदानी एंटरप्रायझेस, अॅक्सिस बँक, अदानी पोर्टस, ग्रासिम, टाटा कंझ्युमर्स, आयशर मोटर्स, कोल इंडिया, ट्रेंट, लार्सन टुब्रो, हिंडाल्को, बजाज ऑटो, नेस्ले, इन्फोसिस, सनफार्मा, एसबीआय लाइफ, एनटीपीसी, टाटा स्टील, एचसीएल टेक, ओएनजीसी, डॉ. रे•िज लॅब्ज, जियो फायनॅन्शीयल, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते. मिडकॅप निर्देशांकात पाहता सेल, भारत डायनॅमिक्स, हिंदुस्थान झिंक, डिलीव्हरी, एनएमडीसी, सोना बीएलडब्ल्यू प्रीसीशन यांचेही समभाग मजबूत होत बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

बाजारात अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, आयटीसी, रिलायन्स, विप्रो, मॅक्स हेल्थकेअर, टाटा मोटर्स पीव्ही, भारती एअरटेल, एशियन पेंटस्, टायटन, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा, इटर्नल यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. यासोबत मिडकॅपमधील सीजी पॉवर, पीबी फिनटेक, एनएलसी इंडिया, भारती हेक्साकॉम, डिक्सन टेक्नॉलॉजी, पूनावाला फिन. यांचे समभागही कमकुवत होत बंद झाले होते.

क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी चांगलीच राहिली होती. फक्त दोन निर्देशांक घसरणीत होते. कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, मेटल, फार्मा, आयटी, इन्फ्रा, रियल्टी, ऑइल अँड गॅस यांचे निर्देशांक तेजी राखत बंद झाले होते. यातही मेटल आणि आयटी निर्देशांक अनुक्रमे 351 अंक, 327 अंकांनी वधारत बंद झाले होते.

Advertisement
Tags :

.