महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक दबावात शेअरबाजार घसरणीसोबत बंद

06:59 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स निर्देशांकात 354 अंकांनी घसरण, बँकिंग, आयटी कंपन्यांवर दबाव

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

जागतिक बाजारात दबाव, आशियाई बाजारात नरमाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी घसरणीसह बंद झाला आहे. बाजारात युपीएलचे समभाग सर्वाधिक 12 टक्के इतके घसरणीत होते.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 354 अंकांनी घसरुन 71,731 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 82 अंकांनी घटत 21771 अंकांवर बंद झाला होता. बाजारात बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी लाइफचे समभागही घसरणीत होते. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक दबावामुळे घसरणीत होते. टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल आणि सन फार्मा यांचे समभाग मात्र चांगले तेजी दाखवत व्यवहार करत होते. सिप्ला, ओएनजीसी आणि महिंद्रा यांचे समभाग मजबुत दिसून आले. तर ग्रासिम इंडस्ट्रिज, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभागसुद्धा नुकसानीसह कार्यरत होते.

एकीकडे बाजारात नकारात्मक वातावरण असताना टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल, सिप्ला, सन फार्मा, ओएनजीसी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग चांगल्या तेजीसह 52 आठवड्याच्या उच्चांकावर कार्यरत राहिले होते. पेटीएम, नवीन फ्लोरीन, एसबीआय कार्ड, शारदा क्रॉप केम आणि वेदांत फॅशनचे समभाग मात्र याउलट 52 आठवड्याच्या नीचांकावर घसरलेले होते. सोमवारी शेअरबाजारात सकाळपासूनच चढ-उतार पाहायला मिळाला. जियो फायनॅन्शीयलचे समभाग 15 टक्के वाढले होते. पंजाब आणि सिंध बँकेचे समभाग 7 टक्के तेजीत होते तर ओम इन्फ्रा, एनएमडीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, पटेल इंजिनियरिंग, एक्साइड इंडस्ट्रिज यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

घसरणीच्या यादीत आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, युनिफॉर्म इंडिया, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, देवयानी इंटरनॅशनल यांचाही समावेश होता. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी समूहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे समभाग घसरणीत बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस व अदानी पोर्टस यांचे समभाग काहीशा तेजीसोबत बंद झाले होते.

जागतिक बाजारात दबाव

जागतिक बाजारात पाहता युरोपियन बाजारात पूर्णपणे तेजी कार्यरत होती. अमोरिकेत मिश्र कल होता. डोव्ह जोन्स 75 अंकांनी घसरणीत तर नॅसडॅक 27 अंकांनी तेजीत होता. आशियाई बाजारात दबावाचे वातावरण राहिले हेते. निक्की एक मात्र निर्देशांक 196 अंकांसह तेजीत होता. तर कोस्पी, हँगसेंग व शांघाई कम्पोझीट हे नुकसानीसह व्यवहार करत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article