महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक दबावात शेअरबाजार घसरणीसोबत बंद

06:07 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 202 अंकांनी घसरणीत : आयटी कंपन्यांचे समभाग घसरले

Advertisement

मुंबई’ :

Advertisement

जागतिक बाजारात दबावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स निर्देशांक 202 अंकांनी घसरणीत राहिला. आयटी आणि उर्जा क्षेत्राच्या निर्देशांकांनी नकारात्मक कामगिरी केली.

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 202 अंकांनी घसरत 82352 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 81 अंकांनी घटत 25198 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधल्या 30 पैकी 19 समभागांमध्ये घसरण पहायला मिळाली तर 11 समभाग तेजीत राहिलेले होते. आयटी आणि एनर्जी क्षेत्रातल्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली. विप्रो या आयटी क्षेत्रातील कंपनीचे समभाग 3 टक्के आणि कोल इंडिया या कंपनीचे समभाग 2.81 टक्के घटलेले होते.

याच दरम्यान इकॉस इंडिया मोबिलिटी (िंण्ध्ए) चे समभाग शेअर बाजारात 17 टक्के प्रिमीयमसह एनएसईवर 390 रुपयांवर सूचीबद्ध झाले तर बीएसईवर हेच समभाग 391 रुपयांवर सूचीबद्ध झाले. या समभागाची इश्यू किंमत 334 रुपये होती. लिस्टींगनंतर समभाग जवळपास 32 टक्क्यांपर्यंत (107 रुपये) वाढलेले होते.

शेअरबाजारात एशियन पेंटस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, बजाज फिनसर्व, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, नेस्ले, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचएडीएफसी बँक या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले तर दुसरीकडे पोलाद क्षेत्रातील कंपनी जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरणीत होते. यासोबत एनटीपीसी, मारुती सुझुकी, आयटीसी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, टीसीएच, टायटन, लार्सन टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, अॅक्सीस बँक यांचे समभाग घसरणीत राहिले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 1 पैसा घसरणीसह 83.97वर बंद झाला. जागतिक बाजारामध्ये बुधवारी नकारात्मक वातावरण होते. जपानचा निक्केई 3 टक्के इतका सर्वाधिक घसरणीत राहिला. आशियाई बाजारातदेखील घसरण पहायला मिळाली. हाँगकाँगचा हँगसेंग 1 टक्के आणि चिनचा शांघाय कंपोझिट 0.67 टक्के घसरणीत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article