गुरुवारी अल्पशा तेजीसोबत शेअरबाजार बंद
सेन्सेक्स 254 अंकांनी वधारला, मेटल निर्देशांक दबावात, फेडरलकडून व्याजदर जैसे थे
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतीही कपात न करण्याचा घेतलेला निर्णय व जागतिक बाजारांच्या निराशादायी कामगिरीत भारतीय शेअर बाजार गुरुवारी काहीसा वधारत बंद झाला होता. सेन्सेक्स 254 अंकांनी वाढत बंद झाला. मेटल निर्देशांक जवळपास 4 टक्के इतका घसरणीत राहिला होता. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 254 अंकांनी वाढत 77409 अंकांवर बंद झाला. 50 समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 82 अंकांच्या वधारासह 24168 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 378 अंकांनी वाढत 57963 च्या स्तरावर बंद झाला.
विविध क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी ही मिळतीजुळती दिसून आली. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक वधारासह बंद झाले. सर्वाधिक वाढ एनर्जी निर्देशांकाची झाली, जो 218 अंकांनी वाढत 40457 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे आयटी, मेटल, ऑईल व गॅस यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. आयटी निर्देशांक सर्वाधिक 343 अंकांनी घसरणीत राहिला होता.
समभागांची कामगिरी
सर्वाधिक तेजीत राहणाऱ्या समभागांचा गुरुवारी मॅक्स हेल्थकेअर, इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश होता तर घसरणीत इन्फोसिस, टाटा कंझ्युमर व टेक महिंद्रा यांचा समावेश होता. याखेरीज ट्रेंट, एनटीपीसी, एसबीआय, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, एचयुएल, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेंटस्, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, बजाज ऑटो, महिंद्रा आणि महिंद्रा, हिंडाल्को, इटर्नल, आयटीसी, ओएनजीसी, जियो फायनान्स यांचे समभाग वधारासह बंद झाले. डॉ. रे•िज लॅब्ज, भारती एअरटेल, ग्रासिम, मारुती सुझुकी, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स इंइस्ट्रिज, लार्सन टुब्रो, नेस्ले, श्रीराम फायनान्स यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले होते. रिअल्टी, बँकिंग व वित्तीय संबंधीत समभागांच्या चांगल्या कामगिरीमुळे शेअरबाजाराला तेजीसह बंद होण्यामध्ये यश मिळवता आले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.21 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.55 टक्के वाढत बंद झाला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्या बैठकीत व्याजदर स्थिर राखण्याचा निर्णय घेतला. पण येत्या काळात व्याजदरात वाढ होण्याचे संकेतही त्यांनी दिले. याचा परिणाम अमेरिकेतील बाजारांवर नकारात्मक दिसला.

- इंटरग्लोब 5011
- ट्रेन्ट 3179
- भारत इले. 428
- एनटीपीसी 362
- स्टेट बँक 1042
- एचडीएफसी बँक 798
- हिंदुस्थान युनि 2218
- अदानी पोर्ट 1842
- पॉवरग्रिड कॉर्प 288
- टाटा स्टील 200
- अॅक्सिस बँक 1360
- एशियन पेन्ट्स 2755
- अल्ट्राटेक सिमेंट 11442
- आयसीआयसीआय 1342
- बजाज फिनसर्व्ह 1771
- महिंद्रा-महिंद्रा 3140
- सनफार्मा 1826
- आयटीसी 291
- टायटन 4375
- बजाज फायनान्स 959
- बॉश 40033
- अरोबिंदो फार्मा 1446
- आयआरसीटीसी 523
- एसबीआय लाईफ 1804
- सिमेन्स 3745

- इन्फोसिस 1127
- मारुती सुझुकी 13490
- टेक महिंद्रा 1446
- टीसीएस 2204
- लार्सन अॅण्ड टुब्रो 4189
- एचसीएल टेक 1161
- कोटक महिंद्रा 402
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1327
- भारती एअरटेल 1874
- वरुण बेव्हरेज 531
- प्रेस्टिज 4942
- विप्रो 182
- कोल इंडिया 451
- फेडरल बँक 320
- बीपीसीएल 316
- श्रीराम फायनान्स 1002