For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजार अल्पशा तेजीसह वधारत बंद

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजार अल्पशा तेजीसह वधारत बंद
Advertisement

सेन्सेक्स 12 अंकांनी तेजीत, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

अपेक्षेपेक्षा चांगली जीडीपी वाढ याने शेअर बाजारात मोठी तेजी आली. पण त्यानंतर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि बँकिंग शेअर्सची नकारात्मक कामगिरी शेअरबाजाराला घसरणीत ढकलण्यात हातभार लावणारी ठरली. 1 सप्टेंबर रोजी निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीदिवशी 30 समभागांचा समावेश असणारा सेन्सेक्स निर्देशांक 12 अंकांच्या किंचित घसरणीसह 76,944 अंकांवर बंद झाला. सोबत राष्ट्रीय शेअरबाजाराचा 30 समभागांचा निफ्टी निर्देशांकदेखील 24 अंकांनी घसरून 24,055 वर बंद झाला.

Advertisement

एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रांनी बाजाराला स्थिर करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मिडकॅप निर्देशांक मंगळवारी अधिक तणावात होता. निफ्टी स्मॉलकॅप 100 घसरला, तर निफ्टी मिडकॅप 100 सुद्धा घसरणीसह बंद झालेला दिसून आला. ऑटो, बँकिंग आणि फार्मा क्षेत्राच्या निर्देशांकातील समभागांनी नकारात्मक कामगिरी केली. निफ्टी फार्मा 1.5 टक्के, तर ऑटो आणि पीएसयू बँक 1 टक्केपेक्षा जास्त आणि निफ्टी प्रायव्हेट बँक जवळपास 1 टक्केने घसरला. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये 13 समभाग तेजीत होते.

हे समभाग तेजीत

मंगळवारच्या सत्रात पाहता आयटीसी, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, इन्फोसिस, बजाज ऑटो, डॉ. रे•िज लॅब्ज, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीस, रिलायन्स इंडस्ट्रिज, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स पीव्ही, आयशर मोटर्स, ओएनजीसी, सिप्ला यांचे समभाग मजबूतीसह बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे मारुती, इंडिगो, कोल इंडिया, टायटन, जियो फायनॅन्शीयल, ग्रासिम इंडिया, अॅक्सिस बँक, हिंडाल्को, टाटा कंझ्युमर, टीसीएस, एसबीआय, मॅक्स हेल्थकेअर, आयसीआयसीआय बँक, इटर्नल, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, नेस्ले इंडिया, एशियन पेंटस्, अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, टाटा स्टील, सनफार्मा यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व समभागांचे एकूण बाजार भांडवल 31 ऑगस्ट 2026 रोजी 4,91,58,204.57 कोटी रुपये होते. 1 सप्टेंबर 2026 रोजी ते 4,88,11,607.93 कोटींवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,46,596.64 कोटींची घट झाली आहे.

  • आयटीसी             266
  • एचसीएल टेक     1351
  • इन्फोसिस            1154
  • भारती एअरटेल     1872
  • रिलायन्स इंडस्ट्रीज   1307
  • कोटक महिंद्रा        424
  • अदानी पोर्ट           1646
  • टेक महिंद्रा           1636
  • एचडीएफसी बँक   712
  • पॉवरग्रिड कॉर्प     264
  • टीसीएस            2366
  • इटर्नल                327
  • मॅरिको                836
  • हॅवेल्स इंडिया       1233
  • एसबीआय लाईफ  1748
  • कोल इंडिया     402
  • कोलगेट          1856
  • अंबुजा सिमेंट   402
  • मारुती सुझुकी        12919
  • स्टेट बँक                  1033
  • इंटरग्लोब एव्ही.          5055
  • बजाज फिनसर्व्ह         1970
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा    3242
  • अॅक्सिस बँक            1259
  • टायटन                     5035
  • सनफार्मा                    1930
  • बजाज फायनान्स          1053
  • ट्रेन्ट                            2850
  • लार्सन अॅण्ड टुब्रो          3990
  • आयसीआयसीआय        1436
  • अल्ट्राटेक सिमेंट           11399
  • भारत इले.                     410
  • एशियन पेन्ट्स              2568
  • एनटीपीसी                     327
  • टाटा स्टील                    183
Advertisement
Tags :

.