जागतिक तणावात गुरुवारी शेअरबाजार घसरणीसोबत बंद
सेन्सेक्स 150 अंकांनी घसरणीत, आयटी निर्देशांक पडझडीत, फार्मा समभाग तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजाराला गुरुवारी पहायला मिळाला. तथापि सुरुवातीच्या सत्रामध्ये शेअरबाजारामध्ये तेजी होती पण दिवसअखेर मात्र अल्पशा घसरणीसोबत बाजार बंद झाला. जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध राहिल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांनी कमकुवत होत 78832 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 53 अंकांनी घसरत 23161 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक जवळपास 458 अंकांनी घसरणीसोबत 27821 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक 76 अंकांच्या तेजीसोबत 55176 अंकांवर बंद होताना बाजाराला आधार देताना दिसला.
विविध समभागांची कामगिरी
निफ्टी निर्देशांकामध्ये आयसीआयसीआय बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासीम, सिप्ला, एनटीपीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, डॉ. रे•ाrज लॅब्ज, ओएनजीसी, सनफार्मा, मारुती सुझुकी, टाटा कंझ्युमर, अॅक्सिस बँक यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता इन्फोसिस, एचसीएल टेक, इंटर्नल, अदानी पोर्ट, ट्रेंट, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, बीईएल, एशियन पेंटस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन टूब्रो, कोल इंडिया, हिंडाल्को, श्रीराम फायनान्स, विप्रो यांचा समावेश होता.
जवळपास सर्वच क्षेत्रातील निर्देशांक कमकुवत
शेअर बाजारामध्ये गुरुवारी जवळपास सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. केवळ फार्मा निर्देशांक मात्र अल्पशा तेजीसमवेत बंद होताना दिसला. घसरणीमध्ये पाहता आयटी निर्देशांक सर्वाधिक घसरला होता. या पाठोपाठ एफएमसीजी निर्देशांक 435अंकांनी घसरत 48521 च्या स्तरावर बंद झाला. इतर निर्देशांकामध्ये ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनान्शीयल, इंफ्रा, मेटल, ऑईल व गॅस आणि रियल्टी यांची कामगिरी निराशादायी पहायला मिळाली. या निर्देशांकांनी बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला.
जागतिक बाजारात दबाव
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमा झाल्याने भारतीय शेअर बाजार जसा बिथरला तसा जागतिक बाजारही बिथरलेला दिसून आला. आशियायी बाजारामध्ये घसरण दिसून आली. जपानचा निक्केई 225 अंकांनी घसरला होता. तर दक्षिण कोरियाचा कोस्पीदेखील 0.28 टक्के कमकुवत होता.

- आयसीआयसीआय 1317
- महिंद्रा-महिंद्रा 3001
- कोटक महिंद्रा 392
- सन फार्मा 1798
- भारती एअरटेल 1782
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1262
- अॅक्सिस बँक 1317
- मारुती सुझुकी 13117
- एनटीपीसी 352
- लुपिन 2275
- अपोलो हॉस्पिटल 8528

- इन्फोसिस 1114
- एचसीएल टेक 1110
- अदानी पोर्ट 1787
- इटर्नल 235
- बजाज फायनान्स 870
- भारत इले. 402
- टेन्ट 2711
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3859
- हिंदुस्थान युनि 2138
- बजाज फिनसर्व्ह 1649
- टेक महिंद्रा 1468
- एशियन पेन्ट्स 2685
- टीसीएस 2135
- टाटा स्टील 198
- आयटीसी 282
- इंटरग्लोब 4479
- एचडीएफसी बँक 744
- अल्ट्राटेक सिमेंट 10854
- स्टेट बँक 1000
- पॉवरग्रिड कॉर्प 286
- टीव्हीएस मोटर 3287
- हिंडाल्को 1023
- कोलगेट 2034
- टीएमपीव्ही 375
- श्रीराम फायनान्स 891
- गेल 166
- ब्रिटानिया 5118
- वरुण बेव्हरेज 519
- मॅरिको 811
- जिओ फायनान्स 228