For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक सकारात्मक संकेताने शेअरबाजार तेजीसमवेत बंद

06:36 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक सकारात्मक संकेताने शेअरबाजार तेजीसमवेत बंद
Advertisement

मुंबई :

Advertisement

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण त्याचप्रमाणे सरकारी बँकांची तेजीची कामगिरी यामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगल्या तेजीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 485 अंकांनी तर निफ्टी 173 अंकांनी वाढत बंद झाला.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 485 अंकांनी वधारत 84065 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 173 अंकांच्या वाढीसोबत 25867 अंकांवर बंद झाला. सेन्मसेक्समधील 30 पैकी 21 समभाग तेजीसमवेत तर 9 घसरणीसोबत बंद झाले होते. निफ्टीमध्ये पाहता 50 पैकी 35 समभाग तेजीसमवेत तर 15 समभाग घसरणीसोबत बंद झाले. सोमवारी धातू, बँकिंग आणि रियल्टी कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात तेजीसमवेत कार्यरत होते. चांगल्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक 7.63 टक्के वाढत बंद झाला होता.

Advertisement

समभागांची कामगिरी

स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीराम फायनान्स, ग्रासीम, टायटन, डॉ. रे•ाrज लॅब्ज, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे आयटीसी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता सीपीएसई हा निर्देशांक घसरणीत राहिला होता. ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनान्सीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले.

जागतिक बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. जपानचा निक्केई 3.89 टक्के वाढत 56363 अंकांवर तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 4.10 टक्के वाढत 5928 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे हाँगकाँगचा हेंगसेंग देखील 1.76 टक्के वाढत 27027 अंकांवर चिनचा शांघाय कंपोझिट 1.41 टक्के वाढत 4023 अंकांवर बंद झाला. 6 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचा डो जोन्स 2.47 टक्के वाढत तर नॅसडॅक 2.18 टक्के आणि एस अँड पी-500 निर्देशांक 1.97 टक्के वाढत बंद झाला. 6 फेब्रुवारी रोजी विदेशी गुंतवणुकदारांनी 1950 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1265 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले.

Advertisement
Tags :

.