गुरुवारच्या सत्रात शेअरबाजार सपाट स्तरावर बंद
सेन्सेक्समधील 16 समभाग तेजीत, स्मॉलकॅप-मिडकॅप निर्देशांक दबावात : आयटी निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअरबाजारात चढउताराचे वातावरण दिसून आले. सकाळच्या सत्रात चांगल्या तेजीत असणारा बाजार अखेरच्या क्षणात खाली आला. बँकिंग, वित्तीय सेवा व रियल्टी क्षेत्रातल्या समभागांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. गुरुवारी सरतेशेवटी सपाट स्तरावर दोन्ही बाजार बंद झाले. आयटी निर्देशांकाची कामगिरी चांगली झाली होती. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1 अंकांच्या वाढीसोबत 77186 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 5 अंकांनी घसरत 24072 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 175 अंकांनी घसरत 57582 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभाग तेजीसोबत तर 14 घसरणीसह बंद झाले.
निफ्टीत पाहता इंटरग्लोब एव्हिएशन, विप्रो, एचसीएल टेक, मारुती सुझुकी व महिंद्रा आणि महिंद्रा हे सर्वाधिक तेजीत होते तर दुसरीकडे इटर्नल, एसबीआय लाइफ, बीईएल, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी बँक व बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग मात्र घसरणीत असलेले दिसून आले. टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, एशियन पेंटस्, अदानी एंटरप्रायझेस, पॉवरग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टाटा स्टील, हिंडाल्को, रिलायन्स, बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स यांचेही समभाग मजबुतीसोबत बंद झाले. तर घसरणीत पाहता कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, अॅक्सिस बँक, जियो फायनॅन्शीयल, लार्सन टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी, एचयुएल, ओएनजीसी यांचा समावेश होता.
क्षेत्रांच्या निर्देशांकात ऑटो, आयटी तेजीत
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास ऑटो 122 अंकांनी वाढत 26767 अंकांवर बंद झाला होता. तर एफएमसीजी 121 अंकांनी वाढत 48408 अंकांवर व आयटी निर्देशांक 190 अंकांनी वाढत 28722 अंकांवर बंद झाला होता. ऑईल व गॅस व फार्मा हे निर्देशांकही तेजीत होते.

- इंटरग्लोब एव्ही 5266
- एचसीएल टेक 1188
- बजाज फायनान्स 1037
- मारुती सुझुकी 13773
- महिंद्रा-महिंद्रा 3120
- टेक महिंद्रा 1515
- आयटीसी 279
- टायटन 4625
- टीसीएस 2201
- इन्फोसिस 1081
- भारती एअरटेल 1923
- आयसीआयसीआय 1418
- टाटा स्टील 185
- स्टेट बँक 1031
- पॉवरग्रिड कॉर्प 280
- विप्रो 177
- इन्फो एज 1205
- आयशर मोटर्स 7414

- इटर्नल 286
- भारत इले. 407
- एचडीएफसी बँक 808
- बजाज फिनसर्व्ह 1832
- अॅक्सिस बँक 1304
- एनटीपीसी 342
- कोटक महिंद्रा 377
- ट्रेन्ट 2859
- अल्ट्राटेक सिमेंट 11768
- लार्सन-टुब्रो 3775
- अदानी पोर्ट 1825
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1293
- हिंदुस्थान युनि 2098
- सनफार्मा 1951
- टीव्हीएस मोटर 3561
- पॉवर फायनान्स 401
- गेल 171
- हॅवेल्स इंडिया 1168
- सिप्ला 1428
- कोलगेट 1997
- अंबुजा सिमेंट 433
- जिओ फायनान्स 235