For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअर बाजार अल्पशा तेजीसह बंद

06:20 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअर बाजार अल्पशा तेजीसह बंद
Advertisement

मुंबई :

Advertisement

जागतिक सकारात्मक संकेतानुसार मंगळवारी शेअर बाजार अल्पशा तेजीसमवेत बंद झालेला दिसून आला. सलग सातव्या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजार तेजी दाखवत बंद झाला आहे.मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 32 अंकांनी वाढत 78017 अंकांवर बंद झाला तर दुसऱ्या बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक नाममात्र 10 अंकांनी वाढ 23668 च्या स्तरावर बंद झाला. दिवसभराच्या सत्रामध्ये सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार मुसंडी मारली होती. या दरम्यान तेजीसमवेत सेन्सेक्सने 78741 चा स्तर गाठला होता. तर निफ्टी निर्देशांकानेही एकावेळी 23869 च्या स्तरावर मजल मारली होती.

हे समभाग वधारले

Advertisement

सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग सर्वाधिक वाढलेला होता. अल्ट्राटेकचा समभाग 3 टक्के वाढत बंद झाला. यासोबत इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.

हे समभाग घसरले

शेअर बाजारात फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो, खासगी बँक इंडसइंड बँक, बंदर विकासातील कंपनी अदानी पोर्ट, महिंद्रा आणि महिंद्रा आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग मात्र 5 टक्के इतके मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसून आले. बाजारात गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे बाजार सरतेशेवटी अल्पशा तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्समधील 20 समभाग हे घसरणीसह बंद झाले तर 10 समभाग तेजीसमवेत बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 34 समभाग घसरणीसोबत बंद होताना दिसले. विविध निर्देशांकांच्या कामगिरीवर नजर फिरवली असता कन्झ्युमर ड्युरेबल, मीडीया, धातू, फार्मा आणि ऑईल आणि गॅस निर्देशांक 2 टक्के घसरत बंद झाले होते.

जागतिक स्थिती

आशियाई बाजारामध्ये जपानचा निक्केई 0.46 टक्के तेजीत होता. चीनचा शांघाय कम्पोझिट 0.0015 टक्के घसरलेला पहायला मिळाला. 24 मार्च रोजी अमेरिकेतील डो जोन्सचा निर्देशांक 1.42 टक्के वाढत आणि नॅसडॅक 2.27 टक्के वाढत व्यवहार करत होता. 24 मार्च रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 3055 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 98.54 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

Advertisement
Tags :

.