For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पशा घसरणीसोबत शेअरबाजार बंद

06:25 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्पशा घसरणीसोबत शेअरबाजार बंद
Advertisement

सेन्सेक्स 7 अंकांनी घसरणीत, दिवसभरात चढउताराचे वातावरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारामध्ये घसरणीसोबतच आयटी समभागांच्या दबावातील कामगिरीमुळे भारतीय शेअरबाजार शुक्रवारी अल्पशा घसरणीसोबत बंद झाला. याचदरम्यान शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठण्यामध्ये यश मिळविले होते.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 7 अंकांनी घसरत 75410 बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 10 अंकांनी घसरत 22957 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक 1.64 टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय भारती एअरटेल, लार्सन टुब्रो, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे एशियन पेंटस्, टेक महिंद्रा, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो यांचे समभाग घसरणीत होते.

बीएसई स्मॉलकॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीत राहिला होता. फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांकदेखील कमकुवत होते. एफएमसीजी, आयटी आणि हेल्थ केअरशी संबंधित समभागांमध्ये नफा वसुली दिसून आल्याने शेअर बाजारात शेवटच्या क्षणी घसरण अनुभवायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी या कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीचा परिणामदेखील बाजारावर दिसून आला. निफ्टी बँक, ऑटो, फायनॅन्शियल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवी उच्चांकी पातळी गाठण्यामध्ये यश मिळविले होते. सेन्सेक्स निर्देशांकांने इंट्रा डे दरम्यान 75636  अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. याच दरम्यान निफ्टी निर्देशांकांने 23 हजारांची पातळी ओलांडली होती. गेल्या 9 व्यावसायिक सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 3700 अंकांनी वाढला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते निवडणुकीसंबंधीच्या चिंता मिटलेल्या असून शेअर बाजाराला मोदी सरकार पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने निवडून येणार असल्याचा दाट विश्वास वाटतो आहे.

आशियाई बाजारामध्ये शुक्रवारी घसरण पहायला मिळाली. निक्केई निर्देशांक 225 अंकांनी घसरणीत होता. दक्षिण कोरीयाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग हेदेखील घसरणीत पहायला मिळाले.

Advertisement
Tags :

.