गुरुवारी शेअरबाजार सपाट स्तरावर बंद
सेन्सेक्स 12 अंकांनी तेजीत : धातू, फार्मा समभाग वधारले
वृत्तसंस्था/मुंबई
धातू आणि फार्मा समभागांची कामगिरी मजबूत झालेली असली तरी आयटी आणि सरकारी बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या नकारात्मक कामगिरीचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर गुरुवारी दिसून आला आणि शेअरबाजार दिवसअखेर सपाट स्तरावर बंद झाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 12अंकांच्या वाढीसोबत 84,478 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक केवळ 3 अंकांच्या वाढीसोबत 25,879 अंकांवर बंद झाला. शेअर बाजार सकाळी खुला झाल्यानंतर दिवसभरामध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. सकाळी सेन्सेक्स 84,825 च्या स्तरावर खुला झाला मात्र लगेचच तो काहीसा घसरणीत राहिला. सेन्सेक्समधील कंपन्यांची कामगिरी पाहता एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मजबूत राहिलेले दिसून आले.
दुसऱ्या बाजूला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल, इटर्नल आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग मात्र दबावात बंद झालेले पाहायला मिळाले. एनएसईवर पाहता हिंडाल्को आणि इंडिगो समभाग तेजीत होते. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.35 टक्के घसरला होता तर दुसरीकडे निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.37 टक्के नुकसानीत होता. विविध क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहता निफ्टी, मेटल व रियल्टी निर्देशांक अनुक्रमे 0.44 टक्के, 0.41 टक्के आणि 0.42 टक्के वाढीसोबत बंद झाले होते. याउलट पाहता बँक पीएसयु बँक निर्देशांक 0.68 टक्के इतक्या घसरणीसोबत बंद झाला होता. आशियातील शेअर बाजार गुरुवारी सर्वोच्च स्तरावर कार्यरत होते. जपानचा निक्केई-225 निर्देशांक 0.4 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.3 टक्के इतका वाढला होता. तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.2 टक्के घसरणीत राहिला. एस अँड पी-500 निर्देशांक सपाट स्तरावर कार्यरत राहत हलक्या तेजीसह बंद झाला. नॅसडॅक कंपोझिट 0.26 टक्के घसरणीत होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एशियन पेंट्स 2879
- हिंडाल्को 811
- आयसीआयसीआय 1385
- लार्सन टुब्रो 4002
- पॉवरग्रीड कॉर्प 269
- बजाज फिनसर्व्ह 2056
- भारती एअरटेल 2091
- सिप्ला 1525
- डॉ. रेड्डी ज लॅब्ज 1234
- जिओ फायनान्शियल 310
- ग्रासीम 2777
- मारुती सुझुकी 15749
- सन फार्मा 1737
- अॅक्सिस बँक 1225
- जेएसडब्ल्यू स्टील 1183
- अदानी एन्टरप्रायझेस 2488
- विप्रो 245
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इटर्नल 297
- ओएनजीसी 250
- महिंद्रा आणि महिंद्रा 3699
- भारत इले. 419
- ट्रेंट 4326
- टाटा स्टील 176
- टाटा मोटर्स पीव्ही 397
- श्रीराम फायनान्स 814
- कोल इंडिया 383
- टीसीएस 3105
- अपोलो हॉस्पिटल 7440
- बजाज फायनान्स 1005
- एचयुएल 2407
- इन्फोसिस 1541
- टाटा कंझ्युमर 1154
- अदानी पोर्ट 1499
- मॅक्स हेल्थकेअर 1098
- कोटक महिंद्रा 2075
- एसबीआय लाईफ 1987
- आयशर मोटर्स 6855
- एसबीआय 954
- आयटीसी 405
- टेक महिंद्रा 1451
- टायटन 3839