गुरुवारी शेअरबाजार सपाट स्तरावर बंद
सेन्सेक्स 27 अंकांनी नुकसानीत, मिडकॅप निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
गुरुवारी दिवसभरामध्ये शेअरबाजारात चढउतार पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणी सपाट स्तरावर भारतीय शेअरबाजार बंद झालेला दिसून आला. मिडकॅप निर्देशांकांची कामगिरी चांगली झाली होती. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांमध्ये ऑटो, ऑईल आणि गॅस आणि फार्मा यांची कामगिरी सकारात्मक दिसून आली.
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 27 अंकांनी घसरत 82248 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 14 अंकांनी वाढत 25496 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 144 अंकांच्या वाढीसोबत 61187 अंकांवर बंद झाला. आयसीआयसी बँक, रिलायन्स, एसबीआय आणि आयशर मोटर्स यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला सांभाळण्याचे काम केले. मिडकॅप निर्देशांक 392अंकांच्या वाढीसोबत बंद होताना दिसला.
समभागांची कामगिरी
विविध समभागांची कामगिरी पाहता टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, ओएनजीसी, बीईएल, श्रीराम फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, सीबीआय लाईफ, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, डॉ. रे•ाrज लॅब्ज, सिप्ला, टाटा स्टील, हिंडाल्को, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट, सन फार्मा यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. मिडकॅपमध्ये पाहता मॅनकाईंड, ट्यूब इनव्हेस्टमेंट, ओरॅकल फायनान्सीयल, आयडीएफसी फर्स्ट बँक, भारत डायनॅमिक्स यांचे समभागदेखील तेजीत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
शेअरबाजारात कोटक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, महिंद्रा आणि महिंद्रा, लार्सन टूब्रो, इन्फोसिस, जिओ फायनान्सीयल, इंडिगो, बजाज फिनसर्व, नेस्ले, विप्रो, अल्ट्रा टेक सिमेंट, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर्स, पॉवरग्रीड कॉर्प, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, ग्रासिम, ट्रेंड, इटर्नल यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात पाहता एमआरएफ, डिक्सन टेक्नॉलॉजी, फॅक्ट, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, एसबीआय कार्ड व मुथ्थुट फायनान्स यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांच्या कामगिरी फायनान्शीयल्स व एफएमसीजी यांची कामगिरी खराब झाली. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीत बंद झाले.