शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीत
सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, आशियाई बाजारात तेजी
मुंबई :
आशियाई बाजारातील तेजीचा फायदा सोमवारी भारतीय शेअर बाजारानेदेखील उठविला होता. सेन्सेक्स 938 अंकांनी आणि निफ्टी 257 अंकांनी वधारत बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांनी शेअर बाजाराला तेजी राखण्यात मदत केली.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 938 अंकांनी वाढत 75502 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 257 अंकांनी वाढत 23408 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. तर निफ्टी निर्देशांकातील 50 समभागांपैकी 33 समभागांमध्ये खरेदी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 655 अंकांनी वाढत 54413 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकात 14 पैकी 8 बँकांचे समभाग तेजीत होते.
हे समभाग तेजीत
अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, महिंद्रा आणि महिंद्रा, ट्रेंट, इटर्नल, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, एसबीआय, हिंडाल्को, टाटा स्टील, इंडिगो, एशियन पेंटस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, नेस्ले, अॅक्सिस बँक, एसबीआय लाईफ, टाटा कंझ्युमर, लार्सन टूब्रो, अदानी एंटरप्रायझेस, टाटा मोटर्स पीव्ही, ग्रासिम यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
टीसीएस, जिओ फायनान्स, एनटीपीसी, भारती एअरटेल, सनफार्मा, ओएनजीसी, सिप्ला, श्रीराम फायनान्स, डॉ. रे•ाrज लॅब्ज, कोल इंडिया, मॅक्स हेल्थ केअर, बीईएल, पॉवरग्रीड कॉर्प, विप्रो, फॅक्ट, बंधन बँक, सेल, आयडीबीआय बँक, एचपीसीएल, केपीआयटी टेक्नॉलॉजी यांचे समभाग घसरणीमध्ये राहिले होते.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता निफ्टी ऑटो, कमोडिटिज, फायनान्सीयल, एफएमसीजी, इन्फ्रा आणि मेटल यांचे निर्देशांक तेजीत होते तर आयटी, एनर्जी, सीपीएसई, रियल्टी, फार्मा व तेल आणि गॅस यांचे निर्देशांक घसरणीत होते.