महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुधवारच्या सत्रात शेअरबाजारात तेजी

06:22 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 354 तर निफ्टी 111 अंकांनी मजबूत :आयटीसी, कोटक बँक, स्टेट बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग वधारले

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात तेजीचा कल राहिला होता. यामध्ये आयटीसी, कोटक बँक, स्टेट बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मजबूत राहिल्याचा फायदा हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाचा लाभही सेन्सेक्स व निफ्टीला झाल्याचे दिसून आले.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 354.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 75,038.15 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 111.05 अंकांनी वधारुन निर्देशांक हा 22,753.80 वर बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील घडमोडींचा परिणाम हा भारतीय बाजारावर सकारात्मक झाला. यामुळे पहिल्यांदाच सेन्सेक्स 75,000 च्या टप्प्यावर कार्यरत राहिला होता.

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात भारतीय बाजाराने व्यापकपणे मजबूत कामगिरी केली आहे. या सकारात्मक वातावरणामुळे आशियातील आणि युरोपमधील काही बाजार घसरणीत होते. प्रामुख्याने गुंतवणूकदारांनी अमेरिकेतील व्याजदराबाबतचा निर्णय आणि अमेरिकेतील रोजगाराबाबतची आकडेवारी काय व कशी सादर होते, यावरच आगामी जागतिक अर्थव्यवस्थेची गणिते अवलंबून राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून देण्यात येत आहेत.

बँकेच्या समभागांची चमक :

बुधवारी शेअर बाजारात काहीसा चढउतार राहिला होता. यामध्ये औषध आणि वाहन कंपन्यांचे समभाग प्रभावीत राहिले होते. मात्र यावेळी बँक आणि एनबीएफसी क्षेत्रातील तेजीने बाजाराला सावरले आहे. वधारलेल्या कंपन्यांमध्ये कोल इंडिया व बीपीसीएल तीन टक्क्यांनी मजबूत झाले.

तर कोटक बँक व आयटीसीचे समभाग हे 2.5 टक्क्यांनी वधारले आहेत.  हिंडाल्को आणि भारती एअरटेलसोबत स्टेट बँक यांचे समभाग हे दोन टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी लाईफ आणि सिप्ला यांचे समभाग दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते. तर डिव्हीज लॅब, मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स, लार्सन अॅण्ड टुब्रो व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग घसरले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article