For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार दिवसांच्या तेजीला शेअर बाजारात ब्रेक

06:01 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार दिवसांच्या तेजीला शेअर बाजारात ब्रेक
Advertisement

सेन्सेक्स 104 अंकांनी तर निफ्टी 31 अंकांनी घसरणीत, आयटी निर्देशांकाची चमक, रुपया वधारला

Advertisement

भारतीय शेअर बाजारात सलग चार सत्रामध्ये तेजी राखल्यानंतर मंगळवारी निफ्टी एक्स्पायरी दिवशी घसरणीसोबत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 104 अंकांनी घसरला होता. मेटल समभागांनी शेअर बाजारावर दबाव निर्माण केला. आयटी निर्देशांक मात्र तेजी राखत बंद झाला.

त. भा. वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 104 अंकांनी घसरत 78180 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांनी घसरत 24398 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक 662 अंकांनी म्हणजे 2 टक्के वाढत 27939 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 90 अंकांनी घसरुन 58200 च्या स्तरावर बंद झाला.

विविध समभागांची कामगिरी

तेजीमध्ये पाहता एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, एसबीआय लाईफ, इटर्नल हे प्रामुख्याने तेजीत तर दुसरीकडे ट्रेंट, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस्, बीईएल, सिप्ला आणि टाटा मोटर्स पीव्ही यांचे समभाग घसरणीत होते. यामध्ये ट्रेंटचा समभाग मंगळवारी 12 टक्के घसरत म्हणजेच 416 रुपयांनी कमी होत 2927 च्या स्तरावर बंद झाला. या व्यतिरिक्त मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स, एचयूएल, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, जीओ फायनान्स तसेच सुंदरम् फायनान्स, ज्युबिलंट फूड, पर्सिस्टंट सिस्टीम्स, टोरेंट पॉवर यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता कोल इंडिया, एशियन पेंटस्, आयसीआयसीआय बँक, डॉ. रे•ाrज लॅब्ज, रिलायन्स, हिंडाल्को, विप्रो, अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी, लार्सन टूब्रो, इंडिगो आणि अल्ट्राटेक सिमेंट तसेच कल्याण ज्युवेलर्स, कोचिन शिपयार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र, बायोकॉन, एबी फॅशन अँड रिटेल यांचे समभाग कमकुवत झालेले दिसून आले.  12 निर्देशांकांपैकी एफएमसीजी आणि आयटी तेजीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :

.