शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही तेजीत
सेन्सेक्स 361 अंकांनी मजबूत : आशियात मिळताजुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा कल दिसून आला आहे. यात मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्यात काहीसा दबाव राहणार असल्याचे संकेत होते. मात्र पुन्हा गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने बाजारात तेजीचा कल निर्माण झाला आहे. आशियातील बाजारांमधील मिळताजुळता कल राहिल्याचा लाभ हा भारतीय बाजाराने घेत शेअर बाजारात सकारात्मक कामगिरी केली आहे.
भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसरी तेजी प्राप्त केली असून यात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 361.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 81,921.29 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 104.70 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,041.10 वर बंद झाला आहे.
अमेरिकेतील महागाईचे आकडे सादर होण्याच्या अगोदर आयटीचे समभाग तेजीत आणि कर्करोगावरील औषधांवरील जीएसटी कपात केल्याने औषध कंपन्यांच्या समभागांमध्ये लिलाव राहिल्याने बाजाराला चालना मिळाली.
मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 2.41 टक्क्यांनी तेजीत राहिले. यासह एचसीएल टेक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, अॅक्सिस बँक, टीसीएस, अदानी पोर्टस, टायटन, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस यांचे समभाग हे प्रामुख्याने वधारले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग हे सर्वाधिक 1.77 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यासह बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनलिव्हर, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक संकेत
जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. चीन आणि हाँगकाँगचे निर्देशांक वधारले आहेत.