For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा समभाग वधारला

08:58 PM Feb 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा समभाग वधारला
Advertisement

मुंबई :

Advertisement

केबल उद्योगामध्ये असणाऱ्या स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा समभाग सोमवारी आठ टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. नोमुरा या संस्थेने सदरचा समभाग खरेदी करण्याबाबत आपला कल दर्शवला आहे. ब्रोकरेज फर्मने कंपनीचा समभागाचा भाव 200 पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये स्टरलाईट यांचा महसूल वेगाने वाढलेला असला तरी टेरिफ संदर्भातील अनिश्चित वातावरणाचा परिणाम समभागावर काही अंशी दबाव निर्माण करणारा ठरला होता. पण अमेरिकेने अलीकडेच भारतावर 18 टक्के व्यापार शुल्क निश्चित केल्याने ब्रोकरेज फर्मने समभागाबाबत सकारात्मक वाढीचा संकेत दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.