For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हस्तकला कारागिरांना प्रोत्साहनासाठी पुढे या - आमदार आसिफ सेठ

07:43 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
हस्तकला कारागिरांना प्रोत्साहनासाठी पुढे या   आमदार आसिफ सेठ
Advertisement

► त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

देशातील वीसहून अधिक राज्यांतील विविध हस्तकला कारागिरांची अनेक प्रकारची उत्पादने इंडियन दस्तकार हँडलूम व हँडीक्राफ्ट हाटने बेळगावातील सदाशिवनगर येथील प्रदर्शनात उपलब्ध करून दिली आहेत. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावकरांनी या उत्पादनांची खरेदी करून लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

प्रारंभी इंडियन दस्तकार हँडलूमचे संचालक अहमद खान यांनी आमदार आसिफ ऊर्फ राजू सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, प्रसाद मरगाळे आदी उपस्थित होते.

Advertisement

इंडियन दस्तकार हँडलूम व हँडीक्राफ्ट हाट प्रदर्शन आता कुंदानगरी बेळगावच्या सदाशिवनगर परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्सशेजारी मंगळवार दि. 26 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या प्रदर्शनात देशभरातील 50 हून अधिक स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे.

सदर प्रदर्शनात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरलम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मुरादाबाद, आग्रा, बिहार, झांशी, लखनौ, फिरोजाबाद, मिर्झापूर, नेपाळ, सहारनपूर फर्निचर येथील हस्तकला कारागिरांनी स्वत:च्या हातांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, अशा प्रकारचे हे प्रदर्शन 40 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.