जुनमध्ये 1.35 कोटी टनवर पोहोचले पोलाद उत्पादन
नवी दिल्ली :
भारताच्या पोलाद उत्पादनासाठी चालू आर्थिक वर्षातील पहिला तिमाहीचा कालावधी महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये पोलादाच्या उत्पादनात 4.9 टक्के इतकी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत 4.06 कोटी टन इतके उत्पादन घेतले गेले आहे.
जून 2025 मध्ये 1.30 कोटी टन इतके उत्पादन घेण्यात आले होते. तर जून 2026 मध्ये पोलादाचे उत्पादन 1.35 कोटी टनवर पोहोचले. मागच्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत 3.38 कोटी टन इतक्या पोलादाचे उत्पादन करण्यात आले. याच कालावधीमध्ये देशाच्या कच्च्या पोलादाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यात आली. या योगे उत्पादन 4.21 कोटी टन इतके झाले. मागच्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन 3 टक्के अधिक होते. सरकारने अलीकडच्या काळात महामार्ग, रेल्वे व बंदरांच्या पायाभूत विकासासाठी मोठी गुंतवणूक केल्यामुळे पोलादाची मागणीदेखील वाढली आहे.