महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्थिरबुद्धी जाणून असतो की सुखदु:खे तात्पुरती आहेत

06:05 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, राजा निष्काम कर्मयोगाचे आचरण करणे ही ह्या संसारातून मुक्त होण्याची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी कर्मे करताना ती मला अर्पण करायची सवय लावून घे. त्यासाठी नियमित माझं स्मरण कर. त्यामुळे तुझे मन सकाम कर्मे करण्यापासून दूर होऊन निष्काम कर्मातून मिळणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळवण्यासाठी आतुर होईल. कर्म केलं की आपलं काम संपलं अशी खात्री झाली की, मी म्हणत असलेल्या चांगल्या योगाची तुला प्राप्ती होईल. तुझी बुद्धी स्थिर होऊन ईश्वरचरणी लीन होईल. अशा मनुष्याला स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धीचा म्हणून गौरवतात. असा मनुष्य मनाच्या सर्व इच्छा सोडतो. त्यामुळे त्यांची अहंता आणि ममता गेल्याने तो शांतीरूप होऊन संतुष्ट जीवन जगत असतो. त्याने ओळखलेलं असतं की, कर्तेकरविते ईश्वर असून तो करत असलेलं कार्य हे ईश्वरी कार्य आहे. साहजिकच तो ईश्वराचं सगुण रूप बनतो आणि त्या माध्यमातून त्याच्याकडून अलौकिक कार्य होत असते. आपण सध्या पहात असलेल्या वितृष्ण सर्वसौख्येषु नोद्विग्नो दु:खसङ्गमे । गतसाध्वसरुड्राग स्थिरबुद्धिस्तदोच्यते ।। 54 ।। ह्या श्लोकात असे सांगितले आहे की, स्थिरबुद्धी मनुष्य सर्व सुखांचे ठिकाणी इच्छाहीन, दु:खप्राप्तीचे ठिकाण उद्वेगहीन असून भीती-क्रोध व काम त्याला सोडून निघून गेलेले असतात. हे सर्व कसं घडून येतं ते आपण पाहूयात.

Advertisement

माणसाला आयुष्यात कायम सुख असावे आणि दु:ख कधीच असू नये असे वाटत असते पण सुखदु:खाचे रहाट गाडगे जीवनात सदैव चालूच असते. तरीही मनुष्य त्यातच गुंतून पडत असतो. हा ईश्वरी मायेचा प्रभाव असतो आणि ती मनुष्याला तिच्या मर्जीनुसार नाचवत असते. परंतु असंख्य माणसात एखादा असा असतो की, ज्यांनं ही मायेची लीला ओळखलेली असते. जीवन आहे तर सुखदु:ख असणारंच हे त्यानं समजून घेतलेलं असतं. त्यामुळे त्याचा स्वभाव सुखाची हाव न बाळगणारा, दु:खामुळे आता कसं होणार? या कल्पनेनं घाबरून दु:खी न होणारा असतो. असा मनुष्य भेटला तर त्याला स्थिरबुद्धि म्हणायला हरकत नाही. त्याला ज्या गोष्टींमुळे किंवा व्यक्तींमुळे सुख मिळालंय त्याविषयी ममत्व वाटत नसतं किंवा ज्या परिस्थितीमुळे, व्यक्तींमुळे दु:ख वाट्याला आलंय त्यांचा रागही येत नसतो. प्रारब्धानुसार एखादं सुख वाट्याला आलं तर तो त्याचा आनंद घेईल तसंच एखादा दु:खद प्रसंग घडला तर तेव्हढ्यापुरतं त्याला वाईट वाटेल पण तो त्याचा बाऊ करणार नाही. दु:खात आपलं कसं होईल अशी भीती सामान्य मनुष्याला वाटत असते. म्हणून तो दु:ख नकोच नको आणि चाललेलं आरामशीर आयुष्य असंच चालत राहुदेत अशी अपेक्षा तो करत असल्याने क्वचित प्रसंगी दु:ख वाट्याला आलं की, घाबरतो पण स्थिरबुद्धि मनुष्याला सुख काय किंवा दु:ख काय दोन्हीही तात्पुरती आहेत हे लक्षात आलेलं असल्याने तो दोन्हीबाबत उदासीन असतो. जे जे प्रारब्धानुसार घडेल ते ते स्वीकारत ईश्वरी अनुसंधानात तो पुढे चाललेला असतो. निरपेक्षता अंगी आणल्याने त्याच्या मनातील संकल्पविकल्प संपलेले असतात आणि त्याचं मन ईश्वरचरणी लीन झालेलं असतं. साहजिकच बुद्धीच्या ताब्यात इंद्रिये आलेली असतात आणि विवेकाने तो त्यांच्यावर नियंत्रण करत असतो.

जीवनच जिथं तात्पुरतं आहे तिथं त्यात येणाऱ्या सुखदु:खांची काय पर्वा करायची अशी स्थिरबुद्धि मनुष्याच्या विचारांची बैठक असते. सुख वाटणे किंवा दु:ख होणे या भावना मनाला होत असतात पण ज्याची बुद्धी स्थिर असते अशा स्थिरबुद्धि मनुष्याने मनाला समजावून सांगून मनावर ताबा मिळवलेला असतो. तरीही मन सतत चुळबुळत असते हे लक्षात घेऊन त्यानं मन ईश्वराच्या अनुसंधानात गुंतवून टाकलेले असते.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article