महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अटक झाली तरीही मुख्यमंत्रीपदी रहा!

06:24 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आप’च्या बैठकीत केजरीवाल यांच्याकडे आमदारांचा आग्रह : तुरुंगातून सरकार चालवण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाच्या सर्व आमदारांनी अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही तपास यंत्रणेने अटक केली असली तरी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे, असे आग्रही आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी केजरीवाल यांना बोलावले होते. परंतु त्यांनी पूर्वनियोजित प्रचारदौऱ्याचे निमित्त सांगत चौकशीसाठी जाणे टाळले होते. आता पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी आप आमदारांची बैठक बोलावली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी आम आदमी पक्षाच्या मंत्री आणि नेत्यांविरोधात केलेल्या अलीकडच्या कारवायांबाबत बैठकीत संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.

दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षाला सरकार चालवण्याचा आदेश दिला असून मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्री राहतील, असे बैठकीनंतर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. दिल्लीतील सरकार तुरुंगातून चालवले जात असताना अधिकारी बैठकीसाठी तुऊंगात जातील. तसेच आम्हाला बोलावले तर आम्हालाही जाण्यास आनंद होईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी केजरीवाल यांना आपले म्हणणे कळवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हीही लवकरच तुऊंगात असू अशी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे आतिशी तुऊंग क्रमांक 2 आणि मला तुऊंग क्रमांक 1 मध्ये ठेवण्याची शक्मयता आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही तुऊंगात मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊ, असे ते पुढे म्हणाले.

सौरभ भारद्वाज यांचा भाजपवर हल्लाबोल

बैठकीनंतर दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने पाठवलेल्या समन्सला उत्तर दिले. आम आदमी पार्टीची घोडदौड ही भाजपची सर्वात मोठी अडचण असल्यासंबंधीची चर्चा बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिली. आप आमदार आणि मंत्र्यांवर दाखल झालेल्या खटल्यांची संख्या आणि आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची ज्याप्रकारे तयारी केली जात आहे, त्यावरून भाजप ‘आप’ला घाबरत असल्याचे स्पष्ट होते, असे ते पुढे म्हणाले. अरविंद केजरीवाल यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने दिल्लीतील सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न भाजप आणि पंतप्रधान मोदींनी चालवला आहे. केजरीवाल यांना सत्तेवरून हटवायचे असेल, तर भाजपला निवडणूक लढवून हटवता येणार नाही, हे त्यांना कळून चुकल्यामुळे वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article