'भोगावती'साठी कट्टर विरोधक पी एन व संपतबापू एकत्र
आघाडीत ए वाय गटासह जनता दल सहभागी
भोगावती प्रतिनिधी
सडोली खालसा गावापासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंतचे पारंपरिक विरोधक असणारे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील व शेकापक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील हे भोगावती साखर कारखाना निवडणुकीसाठी एकत्र येण्याची आश्चर्यकारक घटना रविवारी घडली.आघाडीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील गटासह जनता दल सहभागी आहेत. आमदार पी एन पाटील, ए वाय पाटील व क्रांतिसिंह पवार पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.मात्र यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील उपस्थित नव्हते.
भोगावती साखर कारखाना टिकविण्यासाठी,आर्थिक अडचणीतून बाहेर काढून तो सभासदाच्या मालकीचा ठेवण्यासाठीच आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत,असे यावेळी नेतेमंडळींनी स्पष्ट केले.कांँग्रेस,शेकापक्ष,राष्ट्रवादी,जनता दलाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.पत्रकार परिषदेला गोकुळ चे माजी संचालक पी डी धुंदरे,भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर,जेष्ठ नेते कृष्णराव किरुळकर,केरबा भाऊ पाटील,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील,गोकुळचे संचालक प्रा किसन चौगले,मार्केट कमिटीचे चेअरमन भारत पाटील भुयेकर,संचालक शिवाजी पाटील,अक्षय पवार पाटील,संजय कलिकते आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.