महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांची यथास्थिती

06:45 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मात्र, महागाईसंबंधात अतिदक्षतेचा इशारा : युपीआय मर्यादा 1 लाखावरून 5 लाख

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

रिझर्व्ह बँकेने रेपो दर, रिव्हर्स रेपो दर आदी व्याजदरांमध्ये कोणतेही परिवर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या मासिक हप्त्यात कोणतीही वाढ होणार नाही.

या निर्णयामुळे रेपो दर 6.50 टक्के, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 6.25 टक्के, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 6.75 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आणि कॅश रिझर्व्ह रेश्यो 4.50 टक्के हे सर्व दर आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले आहेत. युपीआयची मर्यादा मात्र दिवसाला 1 लाख वरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे.

मात्र, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईसंदर्भात बँक अतिदक्षतेच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट केले. महागाई वाढ होत राहिल्यास ती रोखण्यासाठी त्वरित काही उपाय केले जातील. बँक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महागाईचा दर निर्धारित लक्ष्याच्या आसपास राहील, याची दक्षता घेतली जाईल. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती समाधानकारक असून आर्थिक वाढीसाठी वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे व्याजदर आहेत त्याच स्थितीत ठेवण्यात आले असून नजीकच्या भविष्यकाळातही आर्थिक विकासाची गती समाधानकारक असेल. परिणामी चिंता करण्याचे कारण नाही, अशी आश्वासक भाषा त्यांनी केली.

जागतिक आर्थिक अस्थिरता

2020 ते 2023 या काळात सातत्याने जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर राहिली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची लक्षणे असली, तरी उगवत्या अर्थव्यवस्थांनी आपली प्रतिकारक्षमता सिद्ध केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विपरीत भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढत असून भारताने जागतिक आर्थिक अस्थिरतेशी बळकटपणे दोन हात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महागाई सध्या नियंत्रणात

ग्राहक महागाई निर्देशांक जुलैमध्ये 7.4 टक्क्यांपर्यंत वाढला होता. ऑक्टोबरमध्ये तो 4.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर व्याजदरांची यथास्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात सध्या आर्थिक व्यवहारांची गती दुसऱ्या तिमाहीत मजबूत झाली आहे. या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ 7.6 टक्के इतकी समाधानकारक झाली. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचे निर्देशांकही वधारल्याचे दिसून आले. वस्तू-सेवा कराचे संकलनही उत्तम झाले. ही सर्व लक्षणे अर्थव्यवस्था गतीमान असल्याचे दर्शवितात, असे प्रतिपादन शक्तिकांत दास यांनी केले.

वाढ आणि महागाईची तुलना

अर्थव्यवस्थेची वाढ आणि महागाईची वाढ यांचे गुणोत्तरही समाधानकारक आहे. वस्तुनिष्ठ स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढ या आर्थिक वर्षात 7 टक्के या दराने होईल अशी अपेक्षा आहे. तर महागाई याच काळात 5.4 टक्के या दराने वाढेल असे अनुमान आहे. याचाच अर्थ असा की, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर महागाईवाढीच्या दरापेक्षा अधिक असल्याने चिंता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणार

महागाईवाढीचा दर 4 टक्के या मर्यादेत ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जाणार आहे. बँकेचे हे महत्त्वाचे ध्येय आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेचे वित्तधोरण सावधानतेचे राहणार असून पुरवठाक्षेत्रात असणाऱ्या किंवा निर्माण होऊ शकणाऱ्या अस्थिरतेकडे बँक बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या वित्तबाजारात लिक्विडिटीची समस्या नाही. सणासुदीच्या काळातही बँकेने तिचे व्यवस्थापन योग्य रितीने केले आहे. आयात-निर्यात, परकीय चलनाचा साठा आदी क्षेत्रातही प्रगती होत असल्याची स्पष्टोक्ती अर्थव्यवस्थेचा आढावा घेताना दास यांनी केली.

महागाईचे लक्ष्य साधण्यावर भर

ड आर्थिक वर्षात महागाई 4 टक्क्यांवर जाऊ नये, हे पाहिले जाणार

ड अर्थव्यवस्था गतीमान असल्याने व्याजदरांच्या यथास्थितीचा निर्णय

ड जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था समाधानकारक

ड देशांतर्गत आणि बहिस्थ अर्थव्यवस्था आगामी काळात भक्कम राहणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article