येळ्ळूर खटल्यातील संशयितांचा जबाब नोंदविला
11:29 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. दि. 7 रोजी आरोपींचा जबाब नोंदविण्यात आला. लवकरच या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता असून 15 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. येळ्ळूर गावच्या सीमेवर असलेला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक 2014 मध्ये हटविण्यात आला होता. त्यामुळे गावात मोठा जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. संशयितांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील काम पहात आहेत.
Advertisement
Advertisement