कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिनशेती सारा दंड व प्रत्येक दिवसाच्या दंड वसुलीस स्थगिती मिळावी

12:39 PM Mar 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

पर्यटन प्रकल्पांसाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आकारात असलेला बिनशेती सारा दंड वसुली तसेच प्रत्येक दिवसाच्या दंड वसुलीस स्थगिती मिळावी. या मागणीचे निवेदन तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना पर्यटन व्यवसायिकांच्या वतीने देण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, रवींद्र खानविलकर, देवानंद लोकेगावकर यांसह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र, नदी किनारी बांधलेल्या इमारतींना बिनशेती न केल्यामुळे शेतसारा व अकृषिक वापर केल्याचा अवाजवी गैर आकारणीच्या दंडाच्या नोटीसा देण्यात येत आहेत. यासंदर्भात 13 ऑगस्ट 2024 रोजी ओरोस येथील जनता दरबारामध्ये निवेदन दिलेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दंड वसुलीसाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. आणि त्यानंतर होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर व दंड माफ करण्यात येईल असे सांगितले होते. तरी जिह्यातील पर्यटन व्यावसायिकांना या दंडात्मक कारवाईतून तसेच महसूल विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या दिवसा 30 रुपये ते 100 रुपये वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आपल्या माध्यमातून देण्यात यावे ही नम्र विनंती. अश्या मागणीचे निवेदन पर्यटन व्यवसायिकानी पालकमंत्री नितेश राणे यांना दिले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # sindhudurg news # nitesh rane # malvan # Tarkarli Tourism Development Organization
Next Article