For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर्जेदार शिक्षण दिले तर विद्यार्थी भविष्य घडवतील

05:05 PM May 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दर्जेदार शिक्षण दिले तर विद्यार्थी भविष्य घडवतील
Advertisement

आमदार निलेश राणेंचे प्रतिपादन ; बिबवणे येथे जादूचे प्रयोगाचे आयोजन

Advertisement

कुडाळ -
आजचे विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यांना आता या वयात योग्य आकार दिला आणि दर्जेदार शिक्षण, दर्जेदार व्यवस्था दिली, तर हे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडविणार आहेत.आपला जिल्हा घडविणार आहेत. विद्यार्थी ही आपली गुंतवणूक आहे.या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपले योग्य ते सहकार्य निश्चित राहील. आर्थिक मदत म्हणून खारीचा नाही, तर मोठा वाटा आपल्याकडून या शिक्षण संस्थेला दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेना ( शिंदे गट) आमदार नीलेश राणे यांनी बिबवणे येथे दिली. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या पटांगणावर जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आमदार श्री राणे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर , या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर ,संस्था सचिव प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत, उपाध्यक्ष आनंद गावडे, सहसचिव विठ्ठल माळकर , संचालक दिलीप ओरोसकर, वामन सावंत, रमाकांत चव्हाण व निखिल ओरोसकर , माजी संचालक दयानंद सामंत व सतीश सामंत, मुख्याध्यापक भास्कर पारधी ,शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष श्री सावंत यांच्या हस्ते आमदार श्री.राणे यांचा सत्कार करण्यात आला,तर श्री राणे यांच्या हस्ते जादुगार जितेंद्र रघुवीर यांचा सत्कार करण्यात आला.श्री.राणे म्हणाले , कुठलीही संस्था चालविणे सोपी गोष्ट नाही. या संस्थेची इमारत जीर्ण झाली आहे.त्यामुळे इमारत दुरुस्त करणे, नवीन इमारत उभारणे अशा गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही ज्या हेतूने आपल्याला येथे बोलाविले आहे.तो हेतू वाया जाऊ देणार नाही.तुम्ही जी मागणी केली. त्याच्यापैकी खारीचा नाही, तर मोठा वाटा आपल्याकडून दिला जाईल. याबद्दल काळजी करू नका,असे त्यांनी सांगून विद्यार्थी ही आपली गुंतवणूक आहे. आता या वयात या विद्यार्थ्यांना जो आकार दिला. संस्कारक्षम शिक्षण दिले, तर हेच विद्यार्थी पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी भवितव घडविणार आहेत. त्यामुळे संस्था म्हणून तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला आहे.आपले यासाठी योगदाम असेल याची शंभर टक्के खात्री देतो,अशी ग्वाही त्यांनी दिली.गावाच्या विकासासाठी आपल्याला कधीही हाक मारा.तुमच्या सोबत आहे. कुठे कुठल्या पक्षात आहे.याची काळजी करू नका. आपण स्थानिक आमदार आहे. पालकमंत्री भाजपचे, खासदार भाजपचे आणि आपण शिवसेनेचा आहे. विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही.आपण कुठल्या पक्षात आहोत .ते निवडणुकीपुरतेच असते.त्यानंतर गाव केंद्रबिंदू समजून गावाचा विकास हा केंद्रबिंदू समजून तुम्ही व आपण एकत्र येऊन गाव विकास करूया. तुमच्या गावातील मंडळींशी एकत्र बसून गाव विकासासाठी प्रयत्न करूया,असे आमदार श्री राणे यांनी सरपंच सौ. कुडपकर यांना सुचित केले.संस्थाध्यक्ष श्री सावंत म्हणाले, ग्रामीण भागातील शाळा असली, तरी शहरी भागातील विद्यार्थ्यप्रमाणे आमचे विद्यार्थी शिकले पाहिजेत त्यासाठी आजच्या शिक्षणपद्धतीला अनुसरुन आवश्यक त्या भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्था पालकांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहे. शाळेची सुसज्ज अशी नूतन इमारत बांधण्याचा संकल्प संस्था व पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी केला आहे. इमारतीसाठी आर्थिक उद्दिष्ट मोठे आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक हातभार लागावा, याकडे त्यांनी श्री राणे यांचे लक्ष वेधले. सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक अंकुश कदम यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.