For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलतगा ग्रामस्थांचे रस्त्यासाठी निवेदन

09:53 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अलतगा ग्रामस्थांचे रस्त्यासाठी निवेदन
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisement

अलतगा येथील हवेशीर गल्लीच्या मागील बाजूला नवीन घरे बांधण्यात आली आहेत. त्यांना व गल्लीतील इतर शेतकरी वर्गाला शेणखत व जनावरांना पिंजर चारा आणण्यासाठी व शेणखत नेण्यासाठी रस्ता नाही. कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी या परिसराची त्वरित पाहणी करावी व  रस्ता करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी ग्रा. पं. कर्मचारी किसन हदगल यांच्याकडे अलतगा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. अलतगा गाव कंग्राळी खुर्द ग्रा. पं. क्षेत्रामध्ये येते. अलतगा येथील गणेशनगर रस्त्यापासून मराठी शाळेच्या मागील बाजूपर्यंत देवस्थान पंच कमिटी अलतगा यांनी दोन्ही बाजूकडच्या जागा मालकाकडून पाच-पाच फूट घेऊन रस्ता करूया त्यामुळे सर्वांना सोयीचे होते असे सांगून त्यावेळी दगड घातले होते. परंतु गजानन जयवंत होनगेकर यांचे वडील व शट्टुप्पा राजाई, विठ्ठल राजाई रस्त्याला जागा देत नाहीत म्हणून तक्रार केली. त्यामुळे रस्त्याचे काम थांबले. त्यानंतर तीन-चार वेळा देवस्थान पंच कमिटीकडे अर्ज देण्यात आले. अनेकवेळा रस्त्यासंदर्भात मिटींग घेण्यात आली. परंतु आजपर्यंत रस्ता झालाच नाही. या ठिकाणी आठ नवीन घरे झाली आहेत. या घरातील शेतकरीवर्गाला व हवेशीर गल्लीतीलही इतर नागरिकांना  शेणखत शेताकडे नेणे तसेच पिंजर शेतातून परसामध्ये ठेवण्यास आणणे ही कामे रस्त्याअभावी करता येत नाहीत. यासाठी ग्रा. पं. अध्यक्षांनी पाहणी करून दिलासा द्यावा, अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी हरिश राव, गणपत मोहनगेकर, नागेंद्र धुडूम, नारायण धुडूम, मारुती धुडूम, मल्लाप्पा धुडूम, नारायण आलोजी, रमेश पवारसह मल्लाप्पा घुग्रेटकर, लक्ष्मण धुडूम, नारायण चौगुले, बाळू पाटील, प्रवीण चौगुले, सुरेश घुग्रेटकर, दिनेश कांबळेसह गल्लीतील इतर नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.