आरोपीला लवकरात लवकर गजाआड करा
रोहिणी गुराम खून प्रकरण ; सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन
कट्टा । वार्ताहर
मालवण तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस श्रीमती रोहिणी रमेश गुराम यांचा खून होऊन दोन दिवस उलटले. याबाबत येथील सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने पोलिस दुरक्षेत्र कट्टा यांना रोहिणी गुराम खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यामध्ये त्यांनी पोलिसांना अशी विनंती केली आहे की रोहिणी गुराम यांच्या खून प्रकरणामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात इतर ठिकाणी घरफोडी होत आहे. त्यामुळे सर्व प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावून आरोपींना लवकरच जेरबंद करा व आमचे गाव भयमुक्त करा. तसेच पोलिस प्रशासनावरचा विश्वास परत निर्माण करावा. असे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी मराठा समाज मालवण तालुकाध्यक्ष अरुण भोगले, उपाध्यक्ष बाबा परब, सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी मंडळाचे अध्यक्ष डॉ. गोपाळ सावंत, उपाध्यक्ष विष्णु लाड, सचिव जयंद्रथ परब, खजिनदार छोटू ढोलम मंडळाचे कार्यकर्ते, नारायण चिंदरकर, श्रीकृष्ण गावडे, मनोज राऊळ, शेखर मसुरकर, विनीत भोजणे, सुनील गुराम, परमानंद वेंगुर्लेकर, सुभाष लाड, साबाजी गावडे, विजय परब, राजेश गावडे, अक्षय गावडे, सुशील गावडे, स्वप्नील सावंत, रमेश पुजारे, नंददीपक गावडे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कट्टा दशक्रोशी भागात अनेक परप्रांतीय कामगार कामाच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद संबंधित कार्यालयाकडे नाही. याबाबत गावागावातील पोलिस पाटील यांच्या माध्यमातून परप्रांतीय कामगारांची नोंद करावी अशी मागणी केली.