For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दशावतार कलेला राजाश्रय मिळण्यासाठी कलाकारांनी शासन दरबारी लढा उभारावा

04:47 PM Jan 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दशावतार कलेला राजाश्रय मिळण्यासाठी कलाकारांनी शासन दरबारी लढा उभारावा
Advertisement

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे प्रतिपादन ; परुळेत दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

Advertisement

परळे प्रतिनिधी

दशावतारा मध्ये खूप बदल होत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने पारंपारिक दशावतार सांभाळणे आवश्यक आहे. विविध समस्यांसाठी आणि दशावतार कलेला राजाश्रय मिळण्यासाठी दशावतार कलाकारांनी शासन दरबारी लढा उभारावा त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपले सर्वतोपरी सहकार्य असेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी संस्कृती कला प्रतिष्ठान परूळे आयोजित कै. श्यामसुंदर श्रीपाद सामंत स्मृती सोळाव्या दशावतारी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले कै. वसंत परुळेकर हे अष्टपैलू दशावतारी कलाकार होते ते रंगमंचावर जी भूमिका साकार करत होते त्या भूमिकेशी समर्पित होऊन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. अशा थोर दशावतारी कलाकाराच्या नावाने दिला जाणारा कै.वसंत परुळेकर स्मृती पुरस्कारासाठी माझी निवड केली हे माझे भाग्य समजतो असे उद्गार ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर उर्फ भाई सामंत यांनी व्यक्त केले.

Advertisement

यावेळी व्यासपीठावर अमित सामंत ,ॲड प्रमोद देसाई , ॲड विशाल देसाई ,परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर उर्फ भाई सामंत, अविनाश देसाई, महेश सामंत ,भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, पत्रकार भूषण देसाई ,अभय परुळेकर, मधुसूदन गव्हाणकर, सूर्यकांत परुळेकर ,संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम पेडणेकर ,आदिनारायण देवस्थानचे अध्यक्ष सचिन देसाई, श्री.गावडे आदी उपस्थित होते . त्यावेळी दहावी मध्ये राज्यात प्रथम आलेल्या अर्पिता अमेय सामंत हिचा गौरव करण्यात आला. तसेच गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या चैतन्य सुवास परुळेकर आणि आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलपियाड सन २०२४ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल आराध्य रुपेश मुंडये या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश तांबे यांनी केले तर प्रास्ताविक राजा सामंत यांनी केले

Advertisement
Tags :

.