For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल पावणाई दुग्ध उत्पादक संस्थेची अल्पावधीतील प्रगती कौतुकास्पद

05:08 PM Aug 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल पावणाई दुग्ध उत्पादक संस्थेची अल्पावधीतील प्रगती कौतुकास्पद
Advertisement

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे निवृत्त व्यवस्थापक नामदेव गवळी यांचे प्रतिपादन

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

माडखोल येथील श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने गणेश चतुर्थी निमित्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तूचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर, व्हाईस चेअरमन संदीप येडगे, संचालक पांडुरंग राऊळ, गजानन धुरी, रामचंद्र सावंत, अशोक सावंत, प्रकाश राऊळ, आत्माराम लातये, रुक्मिणी सावंत, आत्माराम साईल आदी उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सुरेश आडेलकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सुरवातीला दिवसा ५ लिटर पासुन अनेक समस्यावर मात करीत आता ५०० लिटर दुध संकलनचा प्रवास कथन केला. तसेच संस्थेच्या पारदर्शक व्यवहारासह मेहनती शेतकऱ्यांमुळेच संस्था निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगुन गोकुळ आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासह पशुखाद्य डेअरीमध्ये उपलब्ध करून देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना दर १० दिवसाचे संगणकीय बिल देऊन सदरचे पेमेंट त्यांच्या थेट खात्यात जमा करण्याच्या पद्धतीमुळे दूध डेअरी व शेतकरी यांचे विश्वासाचे नाते निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच व्यावसायिक तत्वावर दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी लवकरच गोकुळ दुग्ध संघाचे मार्गदर्शन शिबिर घेण्याचे जाहिर केले. यावेळी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे निवृत्त व्यवस्थापक तथा दुग्ध उत्पादक शेतकरी नामदेव गवळी यांनी सहकारातून निर्माण झालेली दुग्ध संस्था दुध संकलन करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम संस्था राबवते हे कौतुकास्पद असल्याचे सांगुन या दुध डेअरीचे संपूर्ण व्यवहार पारदर्शी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कुठलीही शंका नाही. तसेच दर १० दिवसांनी शेतकऱ्यांना पेमेंट मिळत असल्याने पेमेंट कधी मिळणार याची वाट पाहत लागत नाही. आपण सर्व मिळून एकत्र आलो तर मोठे कार्य घडते हे या संस्थेने दाखवून दिले असुन आपला उत्कर्ष सहकारातून शक्य आहे. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनासह गोकुळ व जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.असे आवाहन केले. यावेळी सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दरवर्षी भेटवस्तू देण्याचा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगुन डेअरीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.