सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायती राज्यात झळकतील असे कार्य करा
आ. दीपक केसरकरांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत मुख्यमंत्री समृद्ध ग्राम समृद्ध अभियान कार्यशाळा
सावंतवाडी| प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी ,दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आदर्श काम व्हायला हवे . विशेष करून सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानामध्ये झळकायलाच हव्यात असे दर्जेदार काम करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याला आपण सहकार्य करून ,या मतदार संघातील सर्व ग्रामपंचायती या राज्यात आदर्श ठरतील असे काम व्हायला हवे, लवकरच रत्नसिंधू योजनेला मुदतवाढ मिळाली ,तर निश्चितपणे प्रत्येक गावात विकासात्मक कामांना अधिक गती दिली जाईल. सावंतवाडी तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच , सदस्य ,ग्रामसेवक यांनी आपल्या गावची ग्रामपंचायत एक आदर्श मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान मध्ये येण्यासाठी चांगल्या दर्जाचे काम करा . जे काही सहकार्य हवे असेल ते तुम्हाला दिले जाईल असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले .सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार दीपक केसरकर बोलत होते. या कार्यशाळेत योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य लेखा अधिकारी श्री मेश्राम ,उपअभियंता शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीम परब, सरपंच राजश्री सौदागर, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष अर्जुन कुबल, विस्ताराधिकारी अंकुश जंगले,सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री विनायक पिंगुळकर. आधी उपस्थित होते.सूत्रसंचालन कृषी अधिकारी सौ सावंत यांनी केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.