कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचा

04:40 PM Oct 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

आपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घ्यावी आम्ही संस्था म्हणून तुमच्या पाठीशी राहू असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी केले. नुकतीच पणदूर ता. कुडाळ या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या हायस्कूलचे घवघवीत यश संपादन केले त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष महेंद्र सावंत बोलत होते. यावेळी सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर, संचालक सचिन दळवी, मुख्याध्यापक सुविद्या केरकर, सहा शिक्षक संजय शेवाळे, सचिन पालकर, विनोद चव्हाण, विद्या पालव, मधुरा तांबे, चंद्रलेखा सावंत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यालयाचे १४ वर्षाखालील मुली व मुले तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली च्या संघाने सहभाग घेतला होता. बीन्स अँड पर्सेस यामध्ये १७ वर्षाखाली मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात वरवडे कणकवली संघावर ६विरुद्ध १गोल फरकाने विजय मिळवला व जिल्हा विजेते पटकावले आणि कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली . तसेच १४वर्षाखालील मुली संघाने जिल्हा. १४ वर्षाखाली मुलांच्या संघाने जिल्हा उपविजेते पद पटकावले. सतरा वर्षाखाली मुलांचे संघाने जिल्हा उपविजेतेपद पटकावले.या सर्व संघांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या संघासाठी व्यवस्थापक म्हणून चंद्रलेखा सावंत व विद्या पालव यांनी काम पाहिले. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी सचिव गुरुनाथ पेडणेकर व खजिनदार सदानंद कोलगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सहा. शिक्षक संजय शेवाळे यांनी तर आभार मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article