For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या काळात जिल्हा योगमय बनेल !

05:27 PM Jan 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
येत्या काळात जिल्हा योगमय बनेल
Advertisement

पत्रकार ॲड. संतोष सावंत यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराची सांगता

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा योगमय बनवला जाईल. त्या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यात सहयोग शिक्षक प्रशिक्षण महिन्याभराच्या कालावधीत देण्यात आले आहे. निश्चितपणे येत्या काळात जिल्हा योगमय बनेल. असा निर्धार यावेळी सहयोग शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणात केला.यावेळी. सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ थाटात करण्यात आला. सावंतवाडी येथील वैश्य भवन मध्ये 10 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत एक महिना पतांजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने शंभर दिवसांचे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवारी सकाळी झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदचे तालुकाध्यक्ष तथा तरुण भारतचे प्रतिनिधी ॲड संतोष सावंत व प्रकाश रेडकर.अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर भारत स्वाभिमानचे प्रभारी जिल्हाध्यक्ष व पतंजली योग समितीचे महेश भाट ,सावंतवाडी मधील भारत स्वाभिमानचे माजी जिल्हा प्रभारी श्री महेश भाट ,सावंतवाडी तहसिल प्रभारी श्री लक्ष्मण पावसकर, , श्री अनिल मेस्त्री, श्री रामनाथ सावंत आणि चंद्रशेखर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी शेखर बांदेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सहयोगी प्रशिक्षण शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतानाॲड. संतोष सावंत म्हणाले पतंजली योग समितीने योगाचे महत्त्व लक्षात घेऊन सावंतवाडी तालुक्यातील व्यक्तींसाठी योग प्रशिक्षण घेतलेच. परंतु त्यापुढेही जात सहयोगी शिक्षक प्रशिक्षण देऊन एक नवा आदर्श आखून दिला आहे . निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच योगमय होईल. सहयोगी शिक्षकांनी घेतलेले हे व्रत अविरत सुरू ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना श्री बांदेकर म्हणाले पतंजली योग समितीच्या माध्यमातून योग प्रशिक्षण शिबिर घेतले जात होते. त्याचे बीज रुजले आहे. आज सावंतवाडीतील सहयोगी शिक्षक प्रशिक्षण शिबिराला जो उस्फुर्त सहभाग दिसून आला त्यावरून निश्चितपणे येत्या काळात.. सिंधुदुर्ग जिल्हा योगमय होईल. सहयोगी शिक्षकांनी आजपासून कमीत कमी पाच ते दहा जणांना योगाचे धडे द्यावेत असे ते म्हणाले. यावेळी श्री प्रकाश रेडकर व महेश भट, लक्ष्मण पावसकर यांनी मार्गदर्शन करताना पतंजली योग समितीने योगाचे प्रशिक्षण दिले . त्यावेळी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता पण आता तो मिळत आहे . गुरु - शिष्याचे नाते या प्रशिक्षणातून निर्माण होत आहे. योगातून आरोग्य तर सुदृढ राहतेच पण त्याचबरोबर एक नवीन चैतन्य आणि रोगमुक्तीच्या दिशेने योगा महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल लातये यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ चैताली गवस यांनी केले. या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यप्रभारी श्री. बापू पाडळकर, राज्यप्रभारी श्री. चंद्रशेखर खापणे, श्री. शेखर बांदेकर, डॉ. तुळशीराम रावराणे, श्री. प्रकाश कोचरेकर, वैद्य श्री सुविनय दामले, सौ दिपश्री खाडिलकर, सौ रमाताई जोग आणि सौ प्रणाली मराठे अशा सर्व योगशिक्षकांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.श्री अभय सावंत, सौ ऐश्वर्या सावंत, श्री भरत धुरी, सौ चैताली गवस, सौ शुभ्रा चांदोस्कर, श्री धैर्यशील शिर्के, श्री दिगंबर पावसकर, रेखा जगताप, श्री लक्ष्मण राणे, मेघा धुरी, मृणाली राणे, श्री नागराज, नम्रता राणे, श्री नारायण राणे, निशिगंधा सावंत, श्री प्रकाश आंबिटकर, प्रतीक्षा देसाई, श्री राजेंद्र राणे, सौ रश्मी माणगावकर, श्री रसिक भोगण, श्री सज्जन नाईक, संध्या सौदागर, श्री संदीप बांदेकर, श्री नारायण सावंत, सौ श्रद्धा सावंत, कु स्नेहल कडोलकर, सौ सुधा बांदेकर, सौ सुपर्णा भाईप, सौ वैशाली घाडी , श्री विकास भोगण अशा 30 जणांनी प्रशिक्षण घेतले .

Advertisement

Advertisement
Tags :

.