मैत्रीपूर्ण लढतीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे !
उदयोगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा
सावंतवाडीत
महायुती झाली तर ठीक अन्यथा सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी येथे केले सावंतवाडीत शिवसेना शिंदे गटाचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी गोविंद चित्र मंदिरात झाला. यावेळी आमदार दीपक केसरकर ,आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब ,जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर ,संजय आंग्रे ,विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो ,भारती मोरे ,अजय गोंदावळे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा अथवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची नक्कीच ताकद आहे. मात्र महायुतीचा धर्म म्हणून महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत . यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या नेत्यांशी बोलणे सुरू आहे. परंतु , अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती करण्याच्या बाजूने आहेत. परंतु काही ठिकाणी महायुती न झाल्यास आपण मैत्रीपूर्ण लढतीसाठी सज्ज झाले पाहिजे. सिंधुदुर्गातही कार्यकर्त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी सज्ज रहा असे आवाहन केले. महायुती झाल्यास काय करता येईल आणि न झाल्यास काय करता येईल यासंदर्भात ॲक्शन प्लान आपल्याकडे असला पाहिजे . सिंधुदुर्गात शिवसेनेचे दोन आमदार असल्याने महायुती झाल्यास आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात आपल्याकडे दीपक केसरकरांसारखे ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. ते शांत आहेत तोपर्यंत ठीक अन्यथा त्यांनी पायाने मारलेली गाठ विरोधकांना हाताने सोडवता येणार नाही ,केसरकर यांनी आता इलेक्शन मोडवर आले पाहिजे. सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद दाखवून दिली पाहिजे . ही ताकद दाखवून देण्याची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी मिळणार आहे . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात . त्यांनी आपापसात बसून कुणाला उमेदवारी द्यावी हे निश्चित केले पाहिजे. जेणेकरून पक्षाची ताकद निवडणुकीत दिसेल. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. या योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विरोधकातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोट शिवून होते तर काहीजण कोट घालून झोपले होते आपलीच सत्ता येणार अशी त्यांना खात्री होती परंतु लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. त्यामुळे विरोधकांचे स्वप्न भंगले अशी टीका करत उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्यासारखे जेष्ठ नेते आहेत ते मुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री राहिले होते . त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे त्यांच्याशी महायुती संदर्भात चर्चा झाली पाहिजे असे सांगून उदय सामंत यांनी महायुती संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी महायुती झाली तरी ठीक अन्यथा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यासाठी सज्जे राहावे असे आवाहन केले . नारायण राणे यांच्याप्रमाणे निलेश राणे हेही ताकदवर आहेत त्यांची धडाडी पाहता सिंधुदुर्गात नव्हेतर कोकणातही शिवसेना मजबुतीने उभी राहील असा विश्वास व्यक्त केला . उदय सामंत यांनी राजन तेली यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे त्यांना निलेश राणे अथवा केसरकर यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये असे सांगण्यात आले आहे त्यांचा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना एक नंबर राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कौतुक केले. पक्ष वाढीसाठी ते चांगले काम करत असल्याचे सामंत म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांनी राज्यात महायुती असल्यामुळे आम्ही नेहमीच समन्वयाची भूमिका ठेवली आहे आपल्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची दक्षता घेतली जाईल परंतु आपण लढाईत उतरलो तर ती लढाई होईल तुम्ही आमच्या सोबत आलात तर ठीक अन्यथा तुमच्याशिवाय आम्ही स्वबळावर लढू असे सांगत केसरकर यांनी दुसऱ्याला संधी मिळू नये हीच अपेक्षा आहे उदय सामंत महायुतीचे समन्वयक सदस्य आहेत त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील असे स्पष्ट करत केसरकर यांनी काही जणांनी हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला होता त्यामुळे आपण वेगळी भूमिका घेतली आणि राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले होते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी आपण ही भूमिका घेतली होती हीच भूमिका यापुढे राहील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसात बसून कोण उमेदवार हे निश्चित केले पाहिजे कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेवर आपली सत्ता आल्यानंतर आपण तिथे हक्काने कामे घेऊन जाऊ शकतो याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी केले आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहेत दोन्ही मतदारसंघात आपली ताकद आहे पण गेले काही दिवस महायुती की स्वबळावर यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता मित्र पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला होता त्यामुळे मला दोन दिवसापूर्वी भूमिका स्पष्ट करावी लागली आम्ही स्वबळावर लढण्यात तयार आहोत हे जाहीर केले मित्र पक्षाचा सावंतवाडी आणि कुडाळ मालवण या दोन मतदारसंघावर लक्ष आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात आमची पूर्ण तयारी झाली आहे आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज झालो आहोत वरिष्ठ पातळीवर महायुती बाबत जो निर्णय होईल तो मान्य राहील परंतु मित्र पक्षाकडूनच स्वबळाचा नारा देण्यात आल्यामुळे आम्ही स्वबळाची तयारी केली असल्याचे राणे म्हणाले. राजन तेली यांनी मला नोटीस आली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही नोटीस येण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशा संदर्भात चर्चा केली होती चर्चा झाल्यानंतर दोन दिवसानंतर या संदर्भात वर्तमानपत्रात बातमी आली त्यामुळे नोटीसी बाबत चर्चा झाली पक्षप्रवेशाचा आणि नोटीसीचा काही संबंध नाही तो केवळ योगायोग होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आपले स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व नेत्यांची मदत घेण्यात येईल असे स्पष्ट केले जिल्हाप्रमुख संजु परब यांनी शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे आमदार केसरकर यांच्या वरील विश्वासामुळे हे पक्ष प्रवेश होत आहेत आगामी काळातही पक्ष प्रवेश होतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा विजय होईल आम्हाला लढायच आणि जिंकायच आहे असे ते म्हणाले