जिमखाना मैदानाचा विकास झाल्यास खेळाडूंच्या टॅलेंटला मिळेल वाव !
10:10 PM Dec 22, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचे प्रतिपादन
Advertisement
फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातही क्रिकेटची क्रेझ कायम आहे. सावंतवाडीसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात टॅलेंट दडलं आहे. मात्र, त्यांच्या टॅलेंटला म्हणावा तसा वाव मिळत नाही. एम् अकॅडमीने शालेय क्रिकेटच्या माध्यमातून केलेली सुरुवात कौतुकास्पद आहे. मात्र, या अकॅडमीतील खेळाडूंना प्रॅक्टीस व सामन्यांसाठी जिमखाना मैदान उपलब्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास येथील खेळाडू नक्कीच राज्य व देशपातळीवर चमकतील, असा आशावाद द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, येथील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी देखील सावंतवाडीत येईन अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
Advertisement
Advertisement
Next Article